Tuesday, May 21, 2024

दु:खद! वास्तव फेम अभिनेता सुनील शेंडे यांनी घेतला अखेरचा श्वास

माध्यमाील वृत्तानुसार मनोरंजमन क्षेत्रामधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. मराठी सिनेसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं रविवार (दि.13, नोव्हेंबर) दिवशी रात्री 1 च्या सुमारास निधन झाले आहे. त्यांनी मराठीच नाही तर, हिंदी चित्रपटतही काम केले होते. ‘वास्तव’, ‘सरफरोश’, ‘गांधी’, अशा अनेक गाजणाऱ्या टित्रपटामध्ये त्यांनी साह्यक भूमिका निभावल्या होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने कला विश्वात शोककळा पसरली आहे.  

मराठी आणि हिंदी चित्रपटात आपली छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेता सुनिल शेंडे यांनी आपल्या राहत्याघरी म्हणजेच मुंबई विले पार्ले रात्री 1च्या सुमारास झाले होते. सोमवार (दि, 14 नोव्हेंबर) दुपारी त्यांचे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुलं ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

सुनील शेंडे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘सरफरोश’, गांधी, वास्तव या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी 90 च्या दशकात अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘निवडुंग’ (1989), ‘मधुचंद्राची रात्र’ (1989), ‘जसा बाप तशी पोर’ (1991), ‘ईश्वर’ (1989), ‘नरसिम्हा’ (1991) या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते लाइमलाईटपासून दूर होते.

 

 

 

ही बातमी सतत अहडेट होत आहे.

हे देखील वाचा