Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड दुःखद! चित्रपट निर्माते गफ्फारभाई नाडियाडवाला यांचे निधन, ९१ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

दुःखद! चित्रपट निर्माते गफ्फारभाई नाडियाडवाला यांचे निधन, ९१ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट निर्माते गफ्फार भाई नाडियाडवाला (Gaffar bhai nadiyadwala) यांचे २२ ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले. ९१ वर्षीय चित्रपट निर्मात्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. गफ्फार भाई नाडियाडवाला यांनी अनेक मल्टिस्टारर चित्रपटांची निर्मिती केली होती. ते विशेषतः मसाला चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते.

महाभारत सारख्या उत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती केली. गफ्फार भाई नाडियाडवाला (एजी नाडियाडवाला म्हणूनही ओळखले जाते) यांनी त्यांच्या ६९ वर्षांच्या कारकिर्दीत ५० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. प्रदीप कुमार आणि दारा सिंग अभिनीत महाभारत सारखे उत्कृष्ट चित्रपट देण्यासाठी ते ओळखले जातात. याशिवाय त्यांनी ‘हेरा फेरी’ (२०००), ‘आवारा पागल दीवाना’ (२००२) आणि ‘वेलकम’ (२००७) या चित्रपटांची निर्मिती केली.

फिरोज नाडियाडवाला यांचे वडील ए.जी. नाडियाडवाला
गफ्फार भाई नाडियाडवाला हे चित्रपट निर्माते एके नाडियाडवाला यांचे पुत्र होते आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या कार्यक्षेत्रातही कारकीर्द घडवली. नाडियाडवाला हे फिरोज नाडियादवाला यांचे वडील आणि साजिद नाडियाडवाला यांचे चुलत भाऊ होते. नाडियाडवाला कुटुंब बॉलिवूडमध्ये चित्रपट निर्मितीसाठी ओळखले जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
पहिल्याच चित्रपटाने विमीला मिळालेली ओळख, परंतु पतीमुळे झालेला करिअरचा सत्यानाश
गोपी बहूच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवोलिनाने घेतलंय फॅशन डिझायनिंगचे शिक्षण, ‘अशी’ झाली करिअरला सुरुवात
‘ह्याच्या पर्सनॅलिटीत काय बी नाय’, प्रथमेश परबबाबत ‘हे’ काय बोलून गेला दिग्गज अभिनेता

हे देखील वाचा