Monday, April 15, 2024

प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची वार्ता, आगामी ‘कल्की’ सिनेमाला मिळाली सेन्सर बोर्डाची परवानगी

कल्कीच्या टीझरला अखेर सेंसरबोर्डने मान्यता दिली आहे. प्रभास, अभिताभ बच्चन, दीपिका पदुकोन या स्टारकास्ट अभिनित ह्या चित्रपटाचा टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रभासचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा ‘सालार’ जगभर गाजतो आहे. ‘सालार’ मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरला आहे. हे त्याच्या बाॅक्स ऑफिस कलेक्शनवरुन समजते. प्रभास त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. कल्कीच्या टीझरची वाट पाहत असलेल्या प्रभासच्या चाहत्यांसाठी खुप मोठी बातमी समोर येते आहे. लवकरच कल्कीचा टीझर प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सेंसरबोर्डची मान्यता
‘कल्की 2898 एडी’ला सेंसर बोर्डने सर्टिफाइड केले आहे. नाग अश्विन दिग्दर्शित हा बिग बजेट साय-फाय सिनेमा संक्रांत २०२४ लाच प्रदर्शित होणार होता.पण पोस्ट प्रोडक्शन लांबल्यामुळे रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

कल्कीचा टीझर कधी होणार रिलीज
चाहत्यांचा उत्साह लक्षात घेत कल्कीचा टीझर संक्रांती दरम्यान रिलीज करणार आसल्याचे समजते आहे. नाग अश्विन दिग्दर्शित स्टारकास्ट असलेला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कल्कीचे जोरदार प्रमोशन
गेल्या वर्षी युएसएमध्ये झालेल्या कॅामिक कॅानमध्ये सिनेमाचे प्रमोशन केले होते.त्यावेळी दिग्दर्शक नाग अश्विन, प्रभास,दीपिका पदुकोन उपस्थीत होते.याचबरोबर सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर यासिनेमाचे प्रमोशन सुरु आहे.

‘कल्की 2898 एडी’ बरोबरच प्रभास मारुती व संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे. तर दीपिका पदुकोन ऋतिक रोशनच्या ‘फायटर’ सिनेमामध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘या गोष्टी माझ्यासोबत देखील घडल्या आहेत’, आयुष्यातीक भयानक गोष्टीबद्दल सनी लिओनीने केले दुःख व्यक्त
‘या’ व्यक्तीने अंकिता लोखंडेला प्रेमात दिलाय धोका; आयशा खानला म्हणाली, ‘हे सगळं मी सहन केलं आहे’

हे देखील वाचा