प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बर्याच वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. गेल्या १३ वर्षांपासून या शोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या शोच्या प्रत्येक पात्राने चाहत्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मग ते जेठालालची भूमिका करणारे दिलीप जोशी असोत किंवा बबिताजीची भूमिका करणारी मुनमुन दत्ता असो. सर्वांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
या शोमध्ये आपण नेहमी पाहतो की, जेठालाल (दिलीप जोशी) आपली शेजारी बबिताजीला (मुनमुन दत्ता) प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असतो. हे पाहून बबिताचा पती कृष्णन अय्यर (तनुज महाशब्दे) रागवत असतो. पण आता आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यात जेठालाल अय्यरच्या समोरच बबिताला आपल्या मनातील गोष्ट सांगतो. (taarak mehta when jethalal told babita i love you ayyars condition happened after hearing this)
कशी मिळाली संधी?
गेल्या वर्षीच्या सुरुवातीला, शोमध्ये मातृभाषेवरून युद्ध झालेलं पाहायला मिळालं होतं. पण या संधीचा फायदा करून घेतला तो जेठालालने. कारण जेठालालला बबिताजीला आपल्या मनातील गोष्ट सांगण्याची संधी मिळाली. होय! शोमध्ये आता जेठालालने बबिताजीला ‘I LOVE U’ म्हटले आहे. पण हे हिंदी किंवा इंग्रजीमध्ये नाही, तर बंगालीमध्ये.
अमी तुमाके भालो बाशी
शोमध्ये जेठालाल आणि बबिताची मैत्री खूपच प्रसिद्ध आहे. गेल्या बऱ्याच काळापासून जेठालाल बबिताला पसंत करतो, हे तर सर्वांनाच माहिती आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा जेठालाल बबिताच्या घरी फुलांचा गुच्छ घेऊन जातो, तेव्हा ती त्याच्याशी बंगाली भाषेत बोलते. पण जेठालालला काहीच समजत नाही. यानंतर जेठालालला अमिताभ बच्चन यांचे गाणे आठवते. ज्यात एक बंगाली ओळ आहे, ‘अमी तुमाके भालो बाशी.’ तो बबिताला ही ओळ बोलून दाखवतो, तितक्यात अय्यर खोलीत प्रवेश करतो.
चांगलाच भडकला अय्यर
हे सर्व ऐकून अय्यरला जेठालालचा खूप राग येतो. कारण याआधी अय्यरनेच जेठालाल आणि बबिता यांच्यात भांडण लावले होते. म्हणूनच जेठालाल बबिताची समजूत काढायला फूल घेऊन आला होता. पण हे पाहून अय्यर चांगलाच तापतो आणि जेठालालला फटकारतो. पण बबिता हे प्रकरण हाताळते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेला मिळाली दयाबेन, मोठ्या दयाबेनने शेअर केला व्हिडिओ