Friday, March 29, 2024

‘बबिताजी’ला जेठालालनेच मिळवून दिला ‘तारक मेहता…’, शोमधील 9 वर्षे लहान व्यक्तीसोबत जोडले गेले अभिनेत्रीचे नाव

अनेकदा टेलिव्हिजन माध्यम मोठे की चित्रपट हा वाद रंगताना दिसतो. काहींना चित्रपटांमध्ये काम केल्यावरच लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळते असे वाटत असते. काही अंशी ते खरे देखील आहे. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकरांना संपूर्ण जगात लोकप्रियता मिळते. याबाबत टेलिव्हिजन कलाकार जरा मागे असतात. मात्र आपल्या देशाचाच विचार केला तर अनेक अशी गावे आहे, जिथे चित्रपटगृह नाही, पण टीव्ही नक्कीच आहे. टेलिव्हिजन आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये फरक आहे. दोन्ही माध्यमांचे फायदे, तोटे देखील आहेत. असे असले तरी दोन्ही माध्यम प्रेक्षकांच्या जवळचे आहे. टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये देखील त्यांच्या कामाचा डंका वाजवत आहे. अनेक कलाकार जर त्यांना चित्रपटांमध्ये यश मिळाले नाही तर टीव्हीची वाट धरतात. तर काही कलाकार दोन्ही माध्यमांमध्ये काम करतात, पण त्यांना यश एकाच माध्यमात मिळते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मुनमुन दत्ता.

‘बबिताजी’ हे नाव ऐकले की लगेच मुनमुनचा चेहरा डोळ्यासमोर येतो. तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेत मुनमुनने ‘बबिताजी’ हे पात्र अजरामर केले आहे. संपूर्ण देशात किंबहुना विदेशातही तिला बबिताजी या नावानेच ओळखले जाते. जिच्या सौंदर्याचे गारुड जेठालालच्या डोक्यावर नेहमीच चढलेले असते, अशी बबिता अर्थात मुनमुन आज (२८ सप्टेंबर) तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.

मुनमुनचा जन्म २८ सप्टेंबर १९८७ साली पश्चिम बंगालच्या दुर्गापुरमध्ये झाला. लहान असताना तिने आकाशवाणीवर बालगायक म्हणून कामही केले. तिने इंग्लिश या विषयात पदवी संपादन केल्यानंतर ती पुण्यात पुढील शिक्षणासाठी आली. इथे जाल्यार तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला फॅशन शोमध्ये वॉक केला. तिला हे क्षेत्र आवडू लागल्याने तिने यातच करिअर करण्याचे ठरवले आणि ती मुंबईला आली. इथे आल्यावर काही काळाने तिला झी टीव्हीच्या ‘हम सब बाराती’ मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

त्यानंतर २००६ साली ती कमल हसन यांच्या ‘मुंबई एक्सप्रेस’मध्ये दिसली. २००८ हे वर्ष तिच्यासाठी महत्वाचे आणि तिच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करणारे ठरले. याच वर्षी तिची वर्णी सोनी सब चॅनेलवरील ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मालिकेत लागली. या मालिकेत ती बबिताजी हे बंगाली पात्र साकारत आहे. २००८ सालापासून आजतागायत मुनमुन या मालिकेचा महत्वाचा भाग आहे. या मालिकेने तिला नाव, प्रसिद्धी, पैसा, लोकप्रियता सर्वच मिळवून दिले. या मालिकेत जेठालालही भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांनीच निर्मात्यांना ‘बबिताजी’ भूमिकेसाठी मुनमूनचे नाव सांगितले होते.

मुनमुन दत्तच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर ती अनेक वादांमध्ये अडकली आहे. तिला अनेकदा चारोळी करण्यात येते. बिग बॉस-७ मध्ये दिसलेला अभिनेता अरमान कोहलीला तिने काही वर्ष डेट केले. २००८ पासून त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. परंतु, काही काळाने दोघांचे रिलेशनशीप संपले. मुनमुनने अरमानवर आरोप केला होता की, तो तिच्यासोबत चांगले वर्तन करत नव्हता तसेच, तो तिला मारहाण देखील करायचा. अरमानने ‘वेलेंटाईन्स डे’च्या दिवशी मुनमुनला मारहाण केली होती. त्यामुळे तिने पोलिसात अरमान विरोधात तक्रार दाखल केली.

मुनमुनला प्रवास करायला खूप आवडते. तिला जसा वेळ मिळेल तशी ती वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देते. मुनमुन तिच्या विविध ट्रिप्सचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती मालिकेत जेवढी स्टायलिश दाखवली आहे, त्यापेक्षा अधिक ग्लॅमरस ती तिच्या खऱ्या आयुष्यात आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी मुनमुन प्रत्येक भागासाठी ३५ ते ५० हजार रुपये चार्ज करते. तिच्याकडे १४ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे.

नुकतेच मुनमूनचे नाव त्यांच्या शोमधील टप्पूची भूमिका साकारणाऱ्या ‘राज अनादकट’सोबत जोडले गेले होते. यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मजेशीर मिम्स व्हायरल देखील झाले होते. या ट्रोलिंगला कंटाळून तिने सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहीत, ‘आज मला भारताची मुलगी म्हणून घेण्यात लाज वाटते असे सांगितले होते.’ याशिवाय तिला तिने सोशल मीडियावर एका विशिष्ट जातीचा उल्लेख केल्यामुळे ट्रोल करण्यात आले आणि तिच्या विरोधात पोलीस तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. तिने हे प्रकरण वाढत आहे हे लक्षात आल्यावर याबद्दल माफी देखील मागितली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा – दाक्षिणात्य सिनेसृष्टी शोकसागरात! अभिनेता महेश बाबूच्या आईचे दुखःद निधन
लता मंगेशकर यांच्यासाठी ‘हे’ गाणे होते खूपच कठीण, मात्र एसपी बालसुब्रमण्यम यांच्या मदतीमुळे गाणे झाले सुकर
लता मंगेशकर यांनी थेट ‘सीआयडी’मधील एसीपी प्रद्युमनवर रोखली होती बंदूक, वाचा रंजक किस्सा

हे देखील वाचा