जेव्हा लातूरच्या महिलेने केला होता ‘शाहरुख’ तीचा मुलगा असल्याचा दावा, कोर्टात गेली होती केस


बॉलीवूड म्हटलं की वाद विवाद आलेच. मग ते व्यक्तिगत आयुष्य असो वा इतर काही. कधी कधी सेलिब्रेटींना चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा त्रासच होतो. काही चाहते सुसाईड करतात, कधी हात कापून घेतात तर कधी आवडत्या सेलीब्रेटीला भेटण्यासाठी तासन् तास वाट पाहातात. परंतू काही लोकं याही पेक्षा वेगळे असतात.

एखाद्या प्रसिद्ध कलाकाराच्या नावाचा वापर करून पैसे उकळण्याची घटना बॉलीवूडमध्ये नव्या नाहीत. बॉलिवूडमधील असे काही लोकप्रिय कलाकार आहेत किंवा झाले आहेत, ज्यांच्या नावाचा चुकीचा वापर करुन काही लोकं कोर्टात गेले होते. काहींना त्या सेलीब्रेटीशी नाते सांगून पैशांचीही मागणी केली होती. चला तर मग पाहुयात अशाच काही लोकांबद्दल, ज्यांच्यामुळे अनेक कलाकार सापडले होते वादाच्या भोवऱ्यात.

अनुराधा पौडवाल
केरळमध्ये राहणाऱ्या एक महिलेने सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांची कन्या असल्याचा दावा केला होता. करमाला मॉडेक्स असे या महिलेचे नाव होते. ती ४५ वर्षाची होती. त्यावेळी तीने एक पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यात तिने हे आरोप लावले होते. या पत्रकार परिषदेत ती म्हणाली होती की, ” मी अनुराधा यांची कन्या आहे. त्यांनी मला जन्म दिला असून व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांनी माझा सांभाळ केला नाही. माझ्या जन्माच्या चौथ्या दिवशी त्यांनी मला पोन्नाचन यांच्याकडे सोपविले होते. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेत हिस्सा आणि ५० कोटीची नुकसानभरपाई त्यांनी मला द्यावी.” ही बाब समोर येताच त्यावेळी खूप वाद निर्माण झाले होते, परंतु अनुराधा यांनी त्या आरोपांना उत्तर देत ते खोटं असल्याचं सांगितलं होतं.

ऐश्वर्या राय
आंध्र प्रदेशातील एका संगीत कुमार नामक व्यक्तीने ऐश्वर्या राय ही आपली आई असल्याचे सांगितले होते.
सन १९८८ मध्ये बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ऐश्वर्याने आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लंडनमध्ये त्याला जन्म दिला होता, असे त्याचे म्हणणे आहे. परंतु कालांतराने हा दावा चुकीचा ठरला होता आणि खोटे आरोप केल्यामुळे त्याला अटक केली होती.

अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नानंतर जान्हवी कपूर नावाच्या एका मॉडेलने अभिषेक तिचा नवरा असल्याचे सांगून गोंधळ उडवून दिला होता. इतकेच नव्हे तर ती ऐश्वर्याचे अभिषेकसोबत लग्न होऊ देणार नाही, असं बोलून तिने अमिताभ बच्चन यांच्या घराच्या बाहेर आपल्या हाताची नस देखील कापली होती. तिच्या या वेडेपणामुळे पोलिसांनी तिला तात्काळ अटक केली होती.

शाहिद कपूर
काही वर्षांपुर्वी शाहिद कपूरने इंडस्ट्रीमध्ये नुकतेच पाऊल ठेवले होते व त्याच्या मागे हजार मुली वेड्या असायच्या. त्यातच नामांकित अभिनेता राजकुमार यांची मुलगी देखील शाहीदच्या मागे वेडी होती. इतकेच नव्हे तर शाहिद आपला पती असल्याचा दावा सुद्धा तिने केला होता. शाहिद जिथे जिथे जायचा ती त्याच्या मागे पोहचायची. तिच्या या त्रासाला अखेर वैतागून शाहीदने तिच्याविरोधत तक्रार दाखल केली होती.

धनुष
तामिळनाडूमधील एका वयोवृद्ध जोडप्यानं आपणच धनुषचे खरे आईवडील असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी दंडाधिकारी कोर्टात याचिका देखील दाखल केली होती. शाळेत असताना तो घर सोडून पळून गेला होता. त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहासाठी त्याने आम्हाला महिन्याला ६५ हजार रुपये द्यावेत अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा हा दावा खोटा ठरला होता. त्यासाठी धनुषला वैद्यकीय चाचणी देखील करावी लागली होती.

शाहरुख खान
एका पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, १९९६मध्ये लातूरमधील एका महिलेने ती शाहरुख खानची आई असल्याचा दावा केला होता. तसेच ती त्याच्या वडीलांपासून वेगळी झालेली असल्याचे तीचे म्हणणे होते. जेव्हा शाहरुखचा फोटो पाहिला तेव्हा मी त्याला ओळखलं, असेही ती म्हणाली होती. तीनेच साठच्या दशकात शाहरुखला मुंबईत आणले असल्याचा व तो हरवल्यामुळे ती परत आपल्या गावी आल्याचा दावा देखील तीने केला होता. तीने शाहरुख खान आपला मुलगा असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती, परंतू पुढे कोर्टाने तो दावा खोडून काढला होता.

 


Leave A Reply

Your email address will not be published.