Tuesday, July 9, 2024

सेक्स रॅकेटने लावली ‘या’ अभिनेत्रींच्या करिअरची वाट; शाहरुख खानच्या अभिनेत्रीचाही आहे समावेश

चकाकणाऱ्या चित्रपटजगतात अशी अनेक प्रकरणे घडली आहेत, ज्यात सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल्सची नावे समोर आली आहेत. सेक्स रॅकेटमध्ये नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली होती. आज आम्ही तुम्हाला त्याच अभिनेत्री आणि मॉडेल्सबद्दल सांगणार आहोत, जे चित्रपट उद्योगाच्या ग्लॅमर व्यतिरिक्त देह व्यापारात अडकल्या होत्या. त्यामुळे त्यांची चित्रपट कारकीर्द संपुष्टात आली होती.

ऐश अन्सारी
सन २०१० मध्ये दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसणारी अभिनेत्री ऐश अन्सारीला सेक्स रॅकेट चालविल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तिला राजस्थानच्या जोधपूरमधील तख्त विलास हॉटेलमधून पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ९ जणांना अटक केली. त्यातीलच एक अभिनेत्री ऐश अन्सारीचे नाव होते, जिने दक्षिण आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, ऐश वेश्या म्हणून काम करायची आणि ती त्याच कामासाठी हॉटेलमध्ये गेली होती. असे म्हणतात की, ऐश अन्सारीशी संबंधित हे सेक्स रॅकेट ऑनलाईन ऑपरेट केले जायचे. ही अभिनेत्री शाहरुख खान अभिनीत फिल्म ‘चलते चलते’ आणि ‘ओम शांती ओम’मध्ये दिसली आहे.

श्वेता बसू प्रसाद
अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद हिने तिच्या पहिल्याच चित्रपट ‘मकडी’मध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. एकेकाळी सेक्स रॅकेटमध्ये तिचे नाव आले होते. २०१४ मध्ये हैदराबादच्या ‘बंजारा हिल्स’ मध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्रीचे नाव आले होते. श्वेता जवळपास २ महिने रेस्क्यू होममध्ये राहिल्यानंतर घरी परतली. मात्र, नंतर या प्रकरणावर श्वेताला हैदराबाद सत्र न्यायालयाने क्लीन चिट दिली होती.

मिष्टी मुखर्जी
मिष्टी मुखर्जीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बंगाली चित्रपटांमधून केली होती. त्यानंतर ती तामिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये दिसली. मिष्टी मुखर्जीने ‘लाइफ की तो लग गई’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. २०१४ मध्ये मिष्टी मुखर्जीवर सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी तिला आक्षेपार्ह स्थितीत अटक केली होती. तसेच, मिष्टी मुखर्जी आता या जगात नाही.

भुवनेश्वरी
अनेक तमिळ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने मने जिंकणाऱ्या भुवनेश्वरीचे नावही २००९ साली सेक्स रॅकेटमध्ये आले होते. भुवनेश्वरी मुंबईच्या दोन मुलींसह देह व्यापार करताना पकडली गेली होती. तिच्यावर तिच्याच अपार्टमेंटमध्ये सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप होता. सेक्स रॅकेट चालविण्याच्या आरोपाखाली भुवनेश्वरीला एकदा नव्हे, तर अनेक वेळा अटक करण्यात आले होते.

शर्लिन चोप्रा
अनेकदा आपल्या अकाऊंटवर नग्न फोटो शेअर करणारी अभिनेत्री म्हणजे शर्लिन चोप्रा. तिने ‘कामसूत्र 3 डी’, ‘वजह तुम हो’, ‘दिल बोले हडिप्पा’ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

https://www.instagram.com/p/CNajZQQnlkl/?utm_source=ig_web_copy_link

काही वर्षांपूर्वी तिने स्वतः तिच्या ट्विटर अकाउंटवर खुलासा केला होता की, ती देह व्यापार करते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा