Thursday, April 25, 2024

आपल्या आवाजाने तरुणांच्या मनावर राज्य करणारे लकी अली तीन लग्न होऊनही राहिले ‘अनलकी’

आपल्या आवाजाच्या जोरावर ९० च्या दशकातील तरुणांच्या मनावर राज्य करणारे प्रसिद्ध गायक लकी अली यांचा आवाज हा सर्वोत्कृष्ट मानला जातो. त्यांची एकापाठोपाठ सुपरहिट होणारी गाणी संपूर्ण जगभरातील चाहत्यांची पहिली पसंती ठरली आहेत. त्यांनी आपल्या आवाजामुळे बॉलिवूड आणि भारतीय संगीत क्षेत्रात ते स्थान प्राप्त केले आहे, जे त्यांना आजपर्यंत स्टार बनवत आहेत. त्यांच्या आवाजाचा एक वेगळाच चाहतावर्ग होता, जो त्यांची ताकद होता. त्यांनी आपल्या आवाजाचा जलवा केवळ अल्बमध्येच नाही, तर चित्रपटांमध्ये देखील एकापेक्षा एक गाणी गात दाखवला आहे.

आपल्या आयुष्यातील कारकिर्दीत यशस्वी ठरवणारे लकी अली वैयक्तिक आयुष्यात मात्र अपयशी ठरले. अली मंगळवारी (19 सप्टेंबर) 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या लेखातून आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत. अलीकडेच लकी अली यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते गोव्यात गाणे गाताना दिसले होते. लकी अली यांचे एकदा नाहीतर तीन वेळा लग्न होऊन देखील ते आजही सिंगल आयुष्य जगत आहेत.

लकी अलींचा संगीत प्रवास
लकी अली यांनी 1996मध्ये संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी आपला ‘सुनो’ हा ॲल्बम लाँच केला होता. त्यांच्या या अल्बममध्ये मॉडेल आणि अभिनेत्री मेघन जेन मॅक्क्लेरी त्यांच्यासोबत दिसली होती. त्यावेळी अल्बममध्ये एकत्र काम करत असताना त्या दोघांमध्ये प्रेमाची चाहूल लागली आणि दोघांमधील प्रेम फुलले. त्यानंतर या दोघांनी एकमेकांशी लग्न केले. लकी अली आणि मेघन जेन मॅक्क्लेरी यांची पहिली भेट वायएमसीएमध्ये झाली होती. मेघन न्यूझीलंडची रहिवासी होती.

माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत लकी अली यांनी त्यांचा एक किस्सा सांगितला होता. लकी अली यांनी सांगितले होते की, मेघन बुधवारी भारतात परतली होती. त्यावेळी दुसऱ्या दिवशी गुरुवारी तिला त्यांनी प्रपोज केले आणि दोघांनी शुक्रवारी लग्न केले. लकी अली आणि मेघन या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

अनाहिताशी केले होते दुसरे लग्न
लकी अली यांनी 2000 नंतर अनाहिता त्यांची दुसरी पत्नी भेटली होती. ती पारशी समाजातील महिला होती. जेव्हा त्यांना अनाहिता भेटली होती, त्यावेळी त्यांची पहिली पत्नी मेघन न्यूझीलंडला होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात आपल्या जोडीदाराची कमी भासू लागली होती. त्यांनी त्यादरम्यानच अनाहिताला प्रपोज केले.

माध्यमांतील वृत्तांनुसार, लकी अली यांनी सांगितले की, “अनाहितासोबत खूप वेळ घालवला. मी कधीही विचार केला नव्हता की, मी तिच्याशी लग्न करेन.” यादरम्यान, जेव्हा त्यांनी पहिली पत्नी मेघनला त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितले, तेव्हा तिची प्रतिक्रिया हैराण करणारी होती. लकी अलीला अनाहिताला इनाया, रायन आणि सारा ही 3 मुले आहेत.

तिसरी पत्नी केट एलिझाबेथ
लकी अली यांनी 2009मध्ये माजी मिस इंग्लंड केट एलिझाबेथ हॅल्लमची भेट घेतली. वर्ष 2010 मध्ये दोघांनी बेंगळुरूमध्ये कोर्ट मॅरेज केले. लकीसाठी केटने तिचा धर्म बदलून अलीशा अली हे नवीन नाव ठेवले. 2011मध्ये या जोडप्याला दानी नावाचा मुलगा झाला. लकी अली यांचे हे लग्न देखील फार काळ टिकले नाही आणि आजही ते सिंगल आयुष्य जगत आहेत.

अभिनयातही केले काम
मीना कुमारीचे नातेवाईक आणि मेहमूद यांचा मुलगा लकी अलीने अभिनय करतानाही केवळ त्यांची कारकीर्द गाण्यापुरती मर्यादित ठेवली नाही, तर1962 मध्ये ते पहिल्यांदा ‘छोटे नवाब’ या चित्रपटात अभिनय करताना दिसले होते. ही भूमिका त्यांनी बालकलाकार म्हणून केली.

यानंतर, त्यांनी 1970 आणि 1980 मध्ये ‘ये है जिंदगी’, ‘हमारे तुम्हारे’, ‘त्रिकाल’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर त्यांनी संजय गुप्तांच्या ‘कांटे’ आणि ‘सुर’ या चित्रपटातही काम केले. दोन्ही भूमिकांमध्ये त्यांना बरीच प्रशंसा मिळाली.

हेही नक्की वाचा- 
उर्फी जावेदने घेतले सिद्धिविनायकचे दर्शन; अभिनेत्रीचा चष्मा पाहून चाहत्यांना लागले वेड,पाहा फोटो
रितेश-जिनिलीयाचा ‘तो’ रोमॅंटिक व्हिडीओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘रितेश दादा आणि वहिनी..’

 

हे देखील वाचा