Sunday, October 1, 2023

पाच राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या शबाना आझमी नक्की शिकल्यात तरी किती? वाचा संपूर्ण माहिती

शबाना आझमी (Shabana Azmi) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे नाव आहे, ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या यश मिळवले आहे. त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अशाच एक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आर्ट सिनेमासोबतच व्यावसायिक चित्रपटांमध्येही उत्तम काम केले आहे. आज त्या त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया त्याच्याबाबत खास माहिती…

त्यांनी १९७४ मध्ये आलेल्या ‘अंकुर’ या चित्रपटात इतका जबरदस्त अभिनय केला की, पदार्पणातच त्यांच्या खात्यावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आला. शबानाने आपल्या चित्रपट कारकिर्दीत पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावण्यात यश मिळवले आहे. शबानाचे वैशिष्टय़ म्हणजे, त्या त्यांच्या पात्रांना अशा प्रकारे आत्मसात करतात की त्यांच्या अभिनयाने प्रेक्षक थक्क होतात. याचा पुरावा त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिकांमधून पाहायला मिळतो. (shabana azmi education details)

‘अंकुर’ या चित्रपटात लक्ष्मीची भूमिका, ‘निशांत’ चित्रपटातील सुशीलाची भूमिका, ‘जुनून’ चित्रपटातील फिरदौसची भूमिका, ‘पार’ चित्रपटातील रामाची भूमिका आणि ‘फायर’ चित्रपटातील राधाची भूमिका साकारली होती. या पात्रांसाठी शबानाचे खूप कौतुक झाले आहे. दमदार कामगिरी करणाऱ्या शबाना आझमी या शिक्षणाच्या बाबतीतही खूप पुढे आहेत. शबाना आझमी या हिंदी चित्रपटसृष्टीतील सुशिक्षित अभिनेत्रींपैकी एक आहे, हे त्यांच्या चाहत्यांना क्वचितच माहीत असेल.

शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण
शबाना आझमी यांचा जन्म १८ सप्टेंबर १९५० रोजी प्रसिद्ध कवी कैफी आझमी यांच्या घरी झाला. शबाना आझमी यांना शालेय शिक्षणासाठी मुंबईतील क्वीन मेरी स्कूलमध्ये पाठवण्यात आले. शालेय शिक्षणानंतर त्या उच्च शिक्षणासाठी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये गेल्या आणि तिथून मानसशास्त्राची पदवी मिळवली. त्यानंतर एफटीआयआयमधून अभिनयाचा कोर्स करून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
जमलं म्हणायचं अन् काय! क्रिती ‘बाहुबली’ फेम ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट? शूटिंगवेळी वाढली जवळीक
‘विक्रम वेधा’च्या नवीन गाण्याचा आख्ख्या मार्केटमध्ये राडा, ऋतिकचा टपोरी डान्स वेधतोय सर्वांचं लक्ष
ड्रीम गर्ल 2 मध्ये आयुष्मान खुरानासोबत अनन्या पांडेला पाहून संतापले प्रेक्षक; म्हणाले, ‘मूड खराब…’

हे देखील वाचा