शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डंकी’ २१ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. राजकुमार हिरानी यांचा हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुखचा हा कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे.
चित्रपटाला मिळत असलेले प्रेम पाहून शाहरुख खाननेही आपल्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे. रविवारी संध्याकाळी शाहरुख खान त्याच्या घरातील मन्नतच्या बाल्कनीत आला आणि त्याने चाहत्यांची भेट घेतली.
त्याचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, जिथे किंग खान मन्नतच्या बाहेर जमलेल्या लाखो चाहत्यांना भेटला. यादरम्यान शाहरुखने सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले. आपल्या डंकी चित्रपटावर प्रेम दाखवण्यासाठी बादशाहने चाहत्यांसमोर हात जोडून त्यांना सलामही केला. इतकंच नाही तर शाहरुख खानने सर्व चाहत्यांना खूश करण्यासाठी आपली सिग्नेचर पोजही दिली.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, ‘डंकी’ने पहिल्या दिवशी 29.2 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि तिसऱ्या दिवशी 25.5 कोटी रुपयांची कमाई केली. आता चौथ्या दिवसाचे प्राथमिक आकडे समोर आले असून त्यानुसार या चित्रपटाने 31.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. आता देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 106.43 कोटींवर पोहोचले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘मी आणि माझे आयुष्यभराचे प्रेम….,’ म्हणत वयाच्या 56 व्या वर्षी अरबाज खानने मांडला दुसरा संसार
‘फायटर’ चित्रपटातील कलाकारांनी घेतली कोटींमध्ये फी, दीपिकाला मिळाले सगळ्यात कमी पैसे