Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड जागतिक पातळीवरच्या पुरस्काराने शाहरुख खान सन्मानित ! ठरला पहिला भारतीय अभिनेता…

जागतिक पातळीवरच्या पुरस्काराने शाहरुख खान सन्मानित ! ठरला पहिला भारतीय अभिनेता…

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरात शाहरुखचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या प्रेमामुळेच शाहरुख आज कुणाचेही पाठबळ नसताना यशस्वी झाला आहे. त्याला जगभरातून विवध पुरस्कार देऊन वेळोवेळी सन्मानित देखील करण्यात आले आहे. भारतातही त्याला पद्मश्री पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे तर जगभरातूनही अनेक ठिकाणी त्याला सन्मानित करण्यात आलंय. पुरस्कारांच्या या यादीत शाहरुखच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे… 

१० ऑगस्ट रोजी लोकार्नो चित्रपट महोत्सवाच्या ७७ व्या आवृत्तीत शाहरुख खानला पार्डो ॲला कॅरिरा – जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा बहुमान मिळवणारा शाहरुख पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे. या महोत्सावाची अनेक छायाचित्रे समोर आली आहे. शाहरुख तिथे गेल्याने वातावरण अगदी भारून गेल्याचं बघायला मिळतंय. शहरुखची उपस्थिती या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरली.यावेळी शाहरुख खान स्लीक ब्लॅक ब्लेझर आणि मॅचिंग ट्राउझर्स घातलेला दिसला.   

शाहरुख खानने त्याच्या स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याच्या भाषणाची सुरुवात केली. तो म्हणाला, ‘खुल्या  हातांनी माझे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद.’ ‘लोकार्नो हे अतिशय सुंदर, अतिशय सांस्कृतिक, अतिशय कलात्मक आणि अतिशय उबदार शहर आहे,’ अगदी भारतासारखं !  

यानंतर शाहरुख खानने सिनेमाविषयी आपले मत मांडले. तो म्हणाला, ‘माझा विश्वास आहे की चित्रपट हे आजच्या काळातील सर्वात प्रगल्भ आणि प्रभावी कलात्मक माध्यम आहे. अनेक वर्षांपासून त्याचा भाग होण्याचे सौभाग्य मला लाभले आहे आणि या प्रवासाने मला बरंच काही शिकवलं देखील आहे. तो पुढे म्हणाला, ‘कला ही जीवनाला श्रेष्ठ ठेवणारी कृती आहे. ती प्रत्येक मानवनिर्मित मर्यादेच्या पलीकडे एका स्वतंत्र ठिकाणी जाउन पोचते. ती राजकीय नसते. ती वादग्रस्त नसते. तिचा प्रचार करण्याची गरज नाही. त्यासाठी विशेष बौद्धिक असण्याची गरज नाही. तिला नैतिकतेची सुद्धा गरज नाही.’ यानंतर शाहरुखने आपल्या चित्रपट प्रवासाची आठवण करून देताना प्रेक्षकांना वचन दिले की तो नेहमी त्याच्या कक्षा अभिनेता म्हणून रुंदावत जाईल.

पुरस्कार दिल्यानंतर संजय लीला भन्साळी निर्मित ‘देवदास’ हा चित्रपट शाहरुखच्या सन्मानार्थ दाखवण्यात आला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

ऐश्वर्या आणि अभिषेक या व्यक्ती मुळे होणार वेगळे ? सोशल मिडीयावर वेगाने पसरतेय बातमी…

 

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा