ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन या जोडीविषयी मागील काही काळापासून अनेक नकारात्मक बातम्या ऐकू येत आहेत. मध्यंतरी त्यांच्या घटस्फोटाविषयी देखील काही अफवा समोर आल्या होत्या. अंबानींच्या लग्नात देखील ऐश्वर्या फक्त मुलीसोबत दिसली होती. त्यानंतर हळू हळू या अफवांवर लोकांचा विश्वास बसू लागला. अभिषेक आणि ऐश्वर्या पब्लिक इवेन्ट देखील एकत्र अटेन्ड करत नाहीयेत.
मुळात अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या वेगळं होण्याच्या अफवा का पसरल्या हा प्रश्न आहे. काही बातम्यांनुसार या प्रकरणात एका डॉक्टरचे नाव आता नव्याने समोर आले आहे. या डॉक्टरचे नाव आहे जिराक मार्कर. जीराक मार्कर आणि ऐश्वर्या यांची अनेक वर्षांपासून मैत्री आहे. मात्र आता नेटकरी म्हणत आहेत कि जर जीराक आणि ऐश्वर्या यांचं नाव एकत्र नसतं आलं तर अभिषेक आणि ऐशच्या वेगळं होण्याच्या अफवा देखील उठल्या नसत्या.
या बातमीला कुठलाही ठोस पुरावा मात्र नाहीये. हे फक्त इंटरनेट वर बांधले जात असलेले वेगवेगळे कायास आहेत. एका कार्यक्रमातून जिराक आणि ऐश्वर्या यांचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. यावरून सोशल मिडिया वापरकर्त्यांनी असा अंदाज बांधला आहे कि ऐश आणि जीराक यांच्यात नक्कीच काहीतरी आहे आणि त्यामुळेच या अफवांना अजून खतपाणी मिळालं आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांचं लग्न २००७ साली झालं होतं. त्यांना २०११ साली एक मुलगी देखील झाली. ऐश्वर्या पूर्वी करिष्मा कपूर सोबत अभिषेकचं लग्न साखरपुडा झाल्यानंतर मोडलं होतं.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
तू छपरी आहेस, तू सडकछाप आहेस ! आपल्या नव्या सिरीज मधून उर्फी देणार ट्रोलर्सना सडेतोड उत्तर …