Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड ‘मर्यादा’ याच गोष्टीमुळे शाहरुख आर्यन खान केसमध्ये होता शांत, त्याच्या मित्राने केला खुलासा

‘मर्यादा’ याच गोष्टीमुळे शाहरुख आर्यन खान केसमध्ये होता शांत, त्याच्या मित्राने केला खुलासा

शाहरुख खान हा त्याच्या ‘पठाण’ सिनेमानंतर सतत लाइमलाईट्मधे आहे. हा सिनेमा हिट झाल्यानंतर तो अनेक महिन्यांनी मीडियासमोर आला. मधल्या काळात त्याच्या आयुष्यात अनेक मोठ्या गोष्टी घडल्या. शाहरुख खानचा मुलगा असलेल्या आर्यन खानला अं’मली पदार्थ सेवनाच्या आरोपाखाली जवळपास एक महिना तुरुंगात देखील जावे लागले. मात्र तो मीडियासमोर आला नाही. असे असले तरी तो सतत त्याच्या मुलाच्या पाठीशी खंबीर उभा होता. शाहरुख एवढी मोठी गोष्ट होऊनही कसा शांत आहे? त्याच्यावर त्याच्या मुलावर अनेक आरोप होत असताना देखील तो का समोर येत नाही आदी अनेक प्रश्न सर्वाना पडले होते, मात्र त्यावर आजपर्यंत उत्तर मिळाले नाही. आता मात्र किंग खानचे मित्र असलेल्या विवेक वासवानी यांनी यावर भाष्य केले आहे.

शाहरुख आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान अं’मली पदार्थ सेवनाच्या आरोपाखाली जेलमध्ये गेला होता. त्याला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईमधील एका क्रूजवरून अटक केली होती. मुंबई हायकोर्टाकडून जामीन मिळेपर्यंत २५ दिवस तो जेलमध्ये होता. मागच्यावर्षी या प्रकरणात आर्यनला एसीबीने क्लिनचीट दिली. या दरम्यान शाहरुख खूपच शांत राहिला.

shahrukh khan

या संपूर्ण प्रकरणात शाहरुख आणि त्याचे कुटुंब शांत होते. ते कधीच मीडियासमोर आले नाही. यावरच त्याचे मित्र असणाऱ्या निर्माता विवेक वासवानी यांनी सांगितले की, “मला वाटते त्याला हा मुद्दा वाढवायचा नव्हता. गौरी, सुहानासोबतच तो देखील काही बोलला नाही आणि आर्यन देखील. याला मर्यादा म्हणतात.”

आर्यन जेलमधून बाहेर आल्यानंतर शाहरुखने मीडियापासून वाचण्यासाठी अनेक शक्कली लढवल्या. तो कधीच मीडियासमोर मोकळेपणाने आला नाही. कदाचित हेच कारण असावे त्याने ‘पठाण’ सिनेमाचे प्रमोशन देखील मीडियाच्या मार्फत केले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! ‘या’ मराठी अभिनेत्रीने वयाच्या पन्नाशीमध्ये बांधली पुन्हा लगीनगाठ, व्हिडिओ झाला व्हायरल

माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा