Monday, February 26, 2024

काय सांगता! ‘या’ मराठी अभिनेत्रीने वयाच्या पन्नाशीमध्ये बांधली पुन्हा लगीनगाठ, व्हिडिओ झाला व्हायरल

आपल्या सगळ्यांसाठीच पहिला वाढदिवस, अठरावा वाढदिवस, पन्नासावा वाढदिवस, पंच्यात्तराहवा वाढदिवस असे काही मोजके वाढदिवस, मग ते लग्नाचे असले तरी खूपच खास असतात. या दिवशी सर्व जणं आपल्या प्रियजनांसाठी काहीतरी नक्कीच खास करून तो दिवस कायम लक्षात राहावे असे करतात. मराठी इंडस्ट्रीमधील प्रतिभासंपन्न अशी ओळख असलेल्या अभिनेत्री, गायिका वंदना गुप्ते यांनी देखील नुकताच त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस साजरा करताना त्यांनी त्या दिवशी खूपच खास असे काहीतरी केले आहे. 

वंदना गुप्ते चित्रपट, मालिका आणि नाटकं अशा तिन्ही माध्यमांमधून त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय हुशार आणि प्रभावी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. सोशल मीडियावरही त्या चांगल्याच सक्रिय आहे. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एक व्हिडिओ देखील शेअर केले आहे. याचमुळे त्या अचानक लाइमलाईट्मधे आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vandana Gupte (@vandanagupteofficial)

वंदना गुप्ते यांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा लगीनगाठ बांधली आहे. वंदना यांनी त्यांचे पती असणाऱ्या शिरीष गुप्ते यांच्याशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आणि या क्षणाचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला. आमच्या खास दिवशी आमच्यासोबत सहभागी होण्यासाठी माझ्या नणंदा आणि भाच्या युएसए आणि कॅनडाहून पोहोचल्या, तर आमची लाडकी लेक वेस्ट इंडिजवरुन आली. त्यांनी घरीच लग्नसोहळा आयोजित केला. जेणेकरुन आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण पुन्हा एकदा अनुभवता येतील. मला सर्वाधिक आनंद याचा झाला की मुलांना आमच्या लग्नात सहभागी होता आले आणि आमचे लग्न एन्जॉय करता आले. तुमच्या हृदयस्पर्शी उपस्थितीने आमचा दिवस अधिक खास बनवल्याबद्दल सर्वांचे आभार.”

वंदना गुप्ते यांच्या या खास दिवशी त्यांचे भारताबाहेर असणारे सर्व नातेवाईक लेक जमले आणि त्यांनी घरच्याघरी हा सोहळा केला. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वंदना यांनी छान सिल्क साडी तर शिरीष यांनी सूट घातलेला दिसत आहे. सर्वानी शुभमंगल सावधान म्हटल्यावर वधू आणि वराने एकमेकांना हार घातला आणि सर्वानी टाळ्या वाजवल्या. सध्या वंदना यांची ही पोस्ट चांगलीच गाजत असून, नेटकऱ्यांसोबतच कलाकारांनी देखील त्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मागणीवर कैलाश खेर यांनी साेडले माैन; म्हणाले, ‘हिंदू जागृत होत आहे’

‘हिंदुत्व खोट्यावर आधारित’ हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला अटक

हे देखील वाचा