शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि डॅशिंग लूकने त्याने हिंदी सिने जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. शाहरुख खानचा ( Shahrukh Khan) सोशल मीडियावरही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. ज्यांच्याशी तो नेहमीच संवाद साधत असतो. सध्या शाहरुख खानची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामधून त्याने त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. काय आहे तो व्हिडिओ चला जाणूनन घेऊ.
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर चाहत्यांसोबत लाईव्ह सेशन केले. याच दिवशी प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक राज कंवर यांच्या ‘दीवाना’ या चित्रपटातून किंग खानने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत 30 वर्षे पूर्ण केली आहेत. चाहत्यांशी थेट संवाद साधताना, शाहरुख त्याच्या सर्व चित्रपट पुरस्कारांसह सर्व ब्लॅक लूकमध्ये दिसत होता.
लाईव्ह सेशनमध्ये शाहरुख खानने त्याच्या आगामी ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांबद्दलही माहिती दिली आहे. ‘पठाण’चा ट्रेलर या वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये रिलीज होणार असल्याचा खुलासा त्यांनी केला. त्याने सलमान खानसह अनेक सेलिब्रिटींबद्दलही चर्चा केली. शाहरुखनेही गमतीने सांगितले की, ‘पठाण’मधील त्याची आणि दीपिका पदुकोणची हेअरस्टाइल सारखीच आहे. यापूर्वी शाहरुखने त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाचे मोशन पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते.
https://www.instagram.com/tv/CfOhQciKKcO/?utm_source=ig_web_copy_link
पोस्टरमधील त्याचा लूक चाहत्यांना खूप आवडला होता. इन्स्टाग्रामवर मोशन पोस्टर शेअर करताना शाहरुखने “30 वर्षे आणि मोजता येणार नाही कारण तुमचे प्रेम आणि स्मित असीम आहे. ‘पठाण’ सोबत हा प्रवास चालू आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी YRF50 सह ‘पठाण’ चित्रपट पहा,” असा कॅप्शन दिला आहे. हा चित्रपट तामिळ, हिंदी आणि तेलुगु भाषेत रिलीज होत आहे. ‘पठाण’ व्यतिरिक्त शाहरुख खान लवकरच ‘जवान’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यासोबतच शाहरुखकडे राजकुमार हिरानीचा ‘डंकी’ हा चित्रपटही आहे ज्यामध्ये तो तापसी पन्नूसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.