बॉलिवूडचा किंग खान २०२३ या वर्षात त्याच्या फॅन्ससाठी सर्वात मोठे गिफ्ट घेऊन आला ‘पठाण’च्या रूपात. तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुख खानचे त्याच्या फॅन्सने अगदी दणक्यात स्वागत केले आहे. संपूर्ण देशात नव्हे संपूर्ण जगात ‘पठाण’ची आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर २५ जानेवारी रोजी हा सिनेमा दणक्यात प्रदर्शित झाला. इतक्या महिन्यापासून चित्रपटगृहांना आणि बॉक्स ऑफिसला आलेली मरगळ क्षणात गेली आणि नवा हुरूप सगळ्यांमध्ये आला. या सिनेमाने कमाईचे तर विविध रेकॉर्ड बनवले सोबतच एक असे रेकॉर्ड बनवले आहे, जे पाहून सिनेमाच्या टिमसोबतच सर्वांनाच खूप आनंद होईल.
Today, with #Pathaan frenzy gripping the nation, we are grateful to KING KHAN for bringing the treasured #HOUSEFULL sign back to the Kashmir Valley after 32 long years! Thank you #ShahRukhKhan???? @iamsrk @thejohnabraham @deepikapadukone @YRF @PathaanTheFilm #YRF50 pic.twitter.com/bkOvyjMrOh
— INOX Leisure Ltd. (@INOXMovies) January 26, 2023
‘पठाण’ संपूर्ण देशातील कानाकोपऱ्यासह प्रदर्शित झाला. याला काश्मीरचा देखील अपवाद नव्हता. काश्मीरमध्ये देखील मोठ्या उत्साहात सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने काश्मीरमध्ये तर मोठी कमाल केली आहे. मागील ३२ वर्षांमध्ये जे इतर चित्रपटांना नाही जमले तर ‘पठाण’ने करून दाखवले आहे. काश्मीरमधल्या चित्रपटगृहांमध्ये ३२ वर्षात पहिल्यांदाच चित्रपटगृहांमध्ये ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागला आहे. सोशल मीडियावर याबद्दल एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. मल्टिप्लेक्सची चेन असलेल्या INOX Leisure Ltd ने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच शाहरुख खानचे आभार देखील व्यक्त केले आहे.
INOX ने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत सांगितले, “आज देशात ‘पठाण’ला घेऊन मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. आम्ही ३२ वर्षाने पुन्हा एकदा काश्मीरमध्ये ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड आणल्याबद्दल किंग खान शाहरुख खानचे आभार मानतो. धन्यवाद शाहरुख खान.” दरम्यान शाहरुखसोबतच सिनेमात जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांचा दमदार अभिनय असलेल्या पठाणने १०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
लाखो चाहत्यांना प्रेमात पाडणारी मौनी रॉय, पहिल्याच भेटीत सुरज नांबियरवर झाली होती फिदा
Ashram 3 | बॉबी देओलसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल बोलली ईशा गुप्ता; म्हणाली, ‘मी तर दहा…’