Tuesday, February 17, 2026
Home बॉलीवूड ‘ब्रह्मास्त्र’मधील शाहरुख खानचा बॉडी डबल सोशल मीडियावर चर्चेत, हॉलिवूडमध्ये केलंय काम!

‘ब्रह्मास्त्र’मधील शाहरुख खानचा बॉडी डबल सोशल मीडियावर चर्चेत, हॉलिवूडमध्ये केलंय काम!

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान(Shah Rukh Khan) सध्या ब्रह्मास्त्रमधील त्याच्या शानदार कॅमिओ भूमिकेमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाक शाहरुखची छोटीशी भूमिका असली तरी यामध्ये तो प्रेक्षकांना आपला चाहता बनवत आहे. ब्रह्मास्त्रमध्ये शाहरुख खानही वानर अस्त्राच्या भूमिकेत जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसला होता. या चित्रपटातील भूमिकेमुळे शाहरुख खान प्रचंड चर्चेत आहे. पण सध्या शाहरुख खानपेक्षा त्याचा बॉडी डबल चर्चेत आला आहे.

सध्या शाहरुख खानचा बॉडी डबल हसित सवानीचा (Hasit Savani) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉडी डबल हसित सवानीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहरुख खान आणि हसित सवानी एकाच कपड्यात आणि एकाच लूकमध्ये दिसत आहेत. हा फोटो शेअर करत हसित सवानीने इन्स्टा कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ब्रह्मास्त्र’मधील दिग्गज शाहरुख खानच्या कॅमिओसाठी त्याचा स्टंट डबल म्हणून करताना खूप मजा आली.’

 

View this post on Instagram

 

कोण आहे हसित सवानी?
बॉडी डबल आणि स्टंट्सच्या जगात हसित सवानी हे एक मोठे नाव आहे. हसितने केवळ टीव्ही आणि बॉलिवूडमध्येच नाही, तर हॉलिवूडमध्येही काम केले आहे. हसितने ‘पेनीवर्थ’, ‘वंडर वुमन’, ‘जस्टिस लीग’, ‘नो टाइम टू डाय’, ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘अ‍ॅव्हेंजर्स’मध्येही काम केले आहे. हसित ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ या चित्रपटातही झळकला आहे.

शाहरुख खाननं ‘ब्रह्मास्त्र’मध्ये ‘वानरास्त्र’ ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याने सुमारे 20 मिनिटांचा कॅमिओ केला. व्यक्तिरेखा लहान असली, तरी शाहरुखने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. काही नेटकऱ्यांनी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामधील शाहरुखच्या लूकचा फोटो शेअर केला आहे.

‘ब्रह्मास्त्र’च्या पुढच्या भागांची आतुरता
‘ब्रह्मास्त्र’ ही तीन चित्रपटांची सीरिज आहे, ज्याचा पहिला भाग ‘शिवा’ हिट झाला आहे. आता प्रेक्षक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अर्थात ‘देवा’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘ब्रह्मास्त्र 2’ देव आणि अमृता यांच्याभोवती फिरताना दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत, मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘म्हणून माझा पहिला चित्रपट माझ्यासाठी शाप’, आयुष्मान खुरानाने सांगितलेले कारण ऐकून बसेल धक्का
रणवीर सिंगच्या ‘त्या’ कृत्याने जिंकली चाहत्यांची मने, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव
‘ब्रह्मास्त्र’मध्ये देवची भूमिका रणवीर सिंग साकारणार का? करण जोहर लाइव्ह चॅटमध्ये म्हणाला, ‘आम्ही हिरो…’

हे देखील वाचा