‘शाहरुख खान’ बनायचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेली स्वरा; अभिनेत्रीला आठवले संघर्षाचे दिवस

0
52
Swara-Bhasker-And-Shahrukh-Khan
Photo Courtesy : Instagram/reallyswara

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. ती तिच्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखली जाते. ती ट्विटरवरही वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असते. तिने नुकतेच एका मुलाखती दरम्यान स्वराने तिच्या संघर्षाबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. तिने यादरम्यान खुलासा केला की, तिला मुंबईत आल्यावर किती अडचणींना समाेर जावे लागले होते.

अभिनेत्री म्हणते डोळ्यात ‘शाहरुख खान’ (Shahrukh Khan) बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आली हाेती. स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिने सांगितले की, मुंबईत घर शाेधणे खूप अवघड आहे. सुरुवातीच्या काळात घर मिळणे हे तिच्यासाठी एका युद्धापेक्षा कमी नव्हते. कोणताही घरमालक तिला आणि तिच्या मैत्रिणीला घर भाड्याने द्यायला तयार नव्हते. कारण, त्यांना वाटले की, या उंडग्या मुली आहेत, ज्यांना नक्कीच बॉयफ्रेंड असेल. स्वराच्या अडचणीत वाढ तर तेव्हा झाली, जेव्हा तिने एका घर मालकाला ‘राईट टू फ्रीडम’ या विषयावर भाषण दिले.

स्वराने 2009मध्ये ‘माधोलाल कीप वॉकिंग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. स्वरा भास्करला 2011मध्ये रिलीज झालेल्या ‘तनु वेड्स मनू’ या सिनेमातून खरी ओळख मिळाली. या चित्रपटात अभिनेत्रीने सहाय्यक भूमिका केली होती, ज्याचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. क्रिटिक्सनेही स्वराच्या या भूमिकेचे कौतुक केले आणि तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. यानंतर 2013मध्ये आलेल्या ‘रांझना’ या चित्रपटातील आपल्या अभिनयाने तिने सर्वांनाच चकित केलं. तिने आतापर्यंत ‘प्रेम रतन धन पायो’, ‘निल बट्टे सन्नाटा’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ आणि ‘वीरे दी वेडिंग’सह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर स्वरा लवकरच ‘जहां चार यार’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. 16 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात मेहर विज, शिखा तलसानिया आणि पूजा चोप्रा हे सहकलाकार आहेत. शिखा तलसानिया आणि स्वरा भास्कर यांनी यापूर्वी ‘वीरे दी वेडिंग’मध्येही एकत्र काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मिस वर्ल्ड’ बनण्यापूर्वी ‘या’ जाहिरातीने रातोरात प्रसिद्ध झालेली ऐश्वर्या, व्हिडिओ वेधतोय लक्ष
‘मिर्झापूर’च्या ‘कालीन भैय्यां’चा मोठा निर्णय! आता कुठल्याच सिनेमात देणार नाहीत शिव्या
तोबा तोबा! ऋतिक रोशनची अभिनेत्री समुद्रकिनारी झाली जास्तच बोल्ड; बिकिनीतील व्हिडिओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here