Friday, July 5, 2024

‘करण अर्जुन’नंतर पुन्हा एकत्र दिसणार शाहरुख आणि सलमान खानची जोडी, आदित्य चोप्रा बनवणार ऍक्शन थ्रिलर!

बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) यांच्याबद्दल दररोज काही ना काही बातम्या येत असतात. मात्र सध्या जी बातमी समोर येत आहे, ती ऐकून सलमान आणि शाहरुखचे चाहते आनंदाने उड्या मारू लागतील. खरं तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान खान आणि शाहरुख खान ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी कॅमिओ केस नसून पूर्ण चित्रपट बनवण्याची तयारी चालू आहे. 

आदित्य चोप्रा करणार दिग्दर्शन
महत्त्वाचे म्हणजे, काही बातम्यांनुसार अशी चर्चा आहे की, लवकरच हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान एका चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. सलमान आणि शाहरुखचा हा चित्रपट सर्वात मोठा ऍक्शन थ्रिलर चित्रपट असेल, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हा चित्रपट आदित्य चोप्राच्या यशराज बॅनरखाली बनवला जाणार आहे. इतकेच नाही, तर आदित्य या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार असल्याचे समजते. असे सांगितले जात आहे की, आदित्य चोप्रा अशा ऍक्शन फिल्मचा विचार करत आहे, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये ऍक्शन फिल्मची व्याख्या बदलेल. मात्र, अद्याप या संपूर्ण प्रकरणाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. (shah rukh khan salman khan will be part action film)

‘करण अर्जुन’मध्ये एकत्र दिसले होते दोन सुपरस्टार
करण अर्जुन हा चित्रपट शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात हे दोन्ही सुपरस्टार एकत्र दिसले होते. मात्र, यानंतर सलमान आणि शाहरुख ‘कुछ कुछ होता है’, ‘हम तुम्हारे हैं सनम’, ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘ट्यूबलाइट’ यांसारख्या एकमेकांच्या चित्रपटांमध्ये कॅमिओ भूमिकेत काम करताना दिसले आहेत. पण आदित्य चोप्राचा हा चित्रपट बनला,तर बऱ्याच कालावधीनंतर शाहरुख खान आणि सलमान खान एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा