अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) लोकप्रियता आणि त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग याचे अनेक रंजक किस्से आजपर्यंत ऐकण्यात आले आहेत. शाहरुख खानचे चाहते त्याची एक झलक पाहायला त्याच्यासोबत फोटो काढायला नेहमीच उत्सुक असतात. मात्र आता काही दिवसांपासून हुबेहुब शाहरुख खानसारखा दिसणाऱ्या त्याच्या चाहत्याची जोरदार चर्चा रंगली आहे. इब्राहिम कादरी असे या चाहत्याचे नाव असून शाहरुख सारखा दिसत असल्याने त्याच्याभोवती लोकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. याचाच अनुभव त्याने सांगितला आहे.
शाहरुख खानसारख्या दिसणाऱ्या इब्राहिम कादरीची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. त्याची एक पोस्ट सध्या सर्वत्र चांगलीच व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याने “माझ्या पालकांना अभिमान होता की त्यांनी एका मुलाला जन्म दिला जो देशाच्या सुपरस्टारसारखा दिसतो. मी लहानपणापासून या गोष्टींकडे लक्ष दिले नाही, पण जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मी हुबेहुब शाहरूखसारखा दिसायला लागलो. शाहरुख खानच्या चाहत्यांप्रमाणेच मलाही भरभरून प्रेम मिळाले” असे म्हणत या सगळ्या आठवणी एका पोस्टमध्ये लिहल्या आहेत.
दुसरी घटना त्याने सांगितली की तो एका स्टेडियममध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात लायन्स यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याला चाहत्यांनी घेरले आणि एका पोलिसानेही त्याला सेल्फी मागितली. त्यानंतर पहिल्यांदाच मला ‘बादशाह’ वाटले, हा माझ्यासाठी खास क्षण होता. पण शाहरुखला रोज कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो हे मला लवकरच कळले. मी एखाद्या दलदलीत अडकल्यासारखे वाटले. कोणीतरी मला इतके घट्ट पकडले की माझा टी-शर्ट फाटला. तिथे माझ्यासोबत असे घडले की मला सुरक्षितपणे स्टेडियममधून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बोलावावे लागले. आणि मला वाचवल्यावर ‘SRK साहेब, एक सेल्फी?’ असे म्हणत माझ्याकडे सेल्फी मागितली.
इब्राहिम कादरी पुढे म्हणाला की, “शाहरुखसारखा दिसण्यासाठी मी त्याला कॉपी करू लागलो. त्यामुळे मी त्याचे सगळे चित्रपट बघायला लागलो आणि त्याच्या स्टाईलची नक्कल करू लागलो. शाहरुख खानच्या लूकमुळे इब्राहिमला अनेक संधी मिळाल्या, त्याला लग्न आणि इतर कार्यक्रमांमध्ये बोलावले जाऊ लागले.” दरम्यान शाहरुख खानसारखा दिसायला त्याला जितका आनंद वाटतो तितकाच इब्राहिमलाही स्वतःची वेगळी ओळख बनवायची आहे. लोकांनी मला एक व्यक्ती म्हणून ओळखावे अशीही माझी इच्छा आहे. इब्राहिमला शाहरुख खानला भेटून त्याचे आभार मानायचे आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा