Friday, March 29, 2024

ब्रेकिंगः ‘केजीएफ २’ मध्ये काम केलेल्या मोठ्या अभिनेत्याचे निधन, बेंगलोरमध्ये घेतला अखेरचा श्वास

‘KGF 2’ मधील अभिनेता मोहन जुनेजा (mohan juneja) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मोहन जुनेजा यांनी 7 मे 2022 (शनिवार) रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बेंगळुरू येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तेथेच त्यांचा मृत्यू झाला. मोहन जुनेजा यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेते आणि कॉमेडियन मोहन जुनेजा यांनी जगाचा निरोप घेऊन आपल्या कुटुंबाला आणि चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.

मोहन जुनेजा ‘KGF 2’ चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसला होता. ‘KGF 1’ या चित्रपटातही त्याने काम केले होते. मोहन जुनेजा यांनी कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेतील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोहन जुनेजा यांना ‘चेतला’ चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला. या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

मोहन जुनेजा यांना लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते आणि ते महाविद्यालयीन जीवनात नाटकांमध्ये काम करायचे. 2008 मध्ये कन्नड चित्रपट ‘संगमा’ द्वारे त्यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केले. तो विशेषतः कन्नड चित्रपटांसाठी ओळखला जातो. याशिवाय त्यांनी अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. मोहन जुनेजा यांच्या निधनाने त्यांचे चाहते आणि चित्रपटसृष्टी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करत आहेत.

मोहन जुनेजा यांनी ‘KGF 2’ या चित्रपटात काम केले असून हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होत आहे. ‘KGF 2’ चित्रपटात यश,(yash) संजय दत्त,(sanjay dutt) श्रीनिधी शेट्टी (shrinidhi) आणि रवीना टंडन (ravina tandon) यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा