प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor)सध्या अनेक नवीन प्रोजेक्ट्सवर काम करत असून, आज तो प्रेक्षकांच्या आवडीचा आणि बहुमुखी अभिनयासाठी ओळखला जाणारा स्टार बनला आहे. एका अलीकडच्या पॉडकास्ट मुलाखतीत शाहिदने आपल्या कारकीर्दीबद्दल आणि संघर्षांबद्दल काही महत्वाचे खुलासे केले.
‘पंजाब फर्स्ट व्हॉइस’ या पॉडकास्टमध्ये बोलताना शाहिदने सांगितले की त्याचे पालक—अभिनेता पंकज कपूर आणि अभिनेत्री नीलिमा अझीम—यांचा घटस्फोट ते फक्त तीन-चार वर्षांचे असताना झाला. त्यानंतर तो प्रामुख्याने आईसोबतच राहत होता. वडिलांशी संपर्क होता, पण एकत्र फारसा वेळ घालवण्याची संधी त्याला मिळत नव्हती.
स्टार किड असल्याचा फायदा झाला का? या प्रश्नावर शाहिद स्पष्ट बोलला. तो म्हणाला, “लोक समजतात की मी ‘स्टार किड’ आहे, पण मला त्याचा कधीच फायदा झाला नाही. माझ्या आईनेच मला वाढवलं. मी कधीही बाबांचं नाव वापरून काम मिळवायचा प्रयत्न केला नाही. त्यांनीही कधी कोणाला फोन करून माझ्यासाठी भूमिका मागितली नाही. माझ्या करिअरमधील प्रत्येक संधी माझ्या मेहनतीची देण आहे.”
आज शाहिद कपूर एक यशस्वी अभिनेता असून, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात तो पत्नी मीरा राजपूत आणि दोन मुलांचा—एक मुलगी आणि एक मुलगा—प्रेमळ पिता आहे. त्याने सांगितले की घरात पाऊल टाकल्या क्षणी तो ‘अभिनेता’ नसून फक्त ‘पती, वडील आणि मुलगा’ असतो. “मी कधीही माझं काम घरी आणत नाही. घर म्हणजे माझ्यासाठी शांततेचं आणि कुटुंबासोबतच्या वेळेचं ठिकाण आहे,” असे तो म्हणाला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
कोण आहे सामंथाचा पती राज निदिमोरू? जाणून घ्या दोघांचीही नेटवर्थ










