Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड ‘माझा अभिमान’ म्हणत शाहिद कपूरने केला पत्नीसोबाबत रोमँटिक फोटो शेअर, एकदा पाहाच

‘माझा अभिमान’ म्हणत शाहिद कपूरने केला पत्नीसोबाबत रोमँटिक फोटो शेअर, एकदा पाहाच

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (shahid kapoor) आणि मीरा राजपूत हे बी-टाऊनमधील चाहत्यांचे आवडते जोडपे आहेत. जे अनेकदा आपल्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. आता अलीकडेच मीरासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करून शाहिदने तिला आपला ‘अभिमान’ म्हटले आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबतचा हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये शाहिद सूट आणि बूटमध्ये डॅशिंग दिसत आहे. तर मीरा ऑफ शोल्डर ब्लॅक आणि ग्रीन गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. मीराने तिचा ग्लॅमरस लूक पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या कानातले आणि बोल्ड मेकअपने पूर्ण केला. तसेच दोघांची केमिस्ट्रीही या फोटोत दिसत आहे.

या सुंदर फोटोमध्ये शाहिद कपूर आपल्या पत्नीकडे मोठ्या प्रेमाने बघताना दिसत आहे. फोटो पोस्ट करताना शाहिदने एक खास कॅप्शनही दिले आहे. त्याने “माझा अभिमान” लिहिले. अभिनेत्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले – “क्यूट कपल”. तर दुसर्‍याने लिहिले – “बॉलिवुडचे नंबर वन कपल… हे कबीर सिंगचे खरे प्रेम आहे.”

यापूर्वी हे जोडपे रोमँटिक ब्रंच डेटवर गेले होते. ज्याचा सेल्फी मीरा राजपूतने तिच्या स्टोरीवर शेअर केला आहे. मीरा आणि शाहिदचे २०१५ मध्ये लग्न झाले होते. आता हे स्टार कपल मीशा आणि मुलगा झैन या दोन मुलांचे पालक आहे. अनेकदा या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘आर्या 3’ रिलीजच्या आधीच सुष्मिता सेनने का घेतलेला अभिनयातून ब्रेक?, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
ऋतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटात संजीदा शेखची वर्णी, ‘या’ महत्वाच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री

 

हे देखील वाचा