Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड इम्रान हाश्मीच्या अभिनेत्रीने केला बोल्ड फोटो शेअर, पाहून शाहिद कपूरच्या वडिलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

इम्रान हाश्मीच्या अभिनेत्रीने केला बोल्ड फोटो शेअर, पाहून शाहिद कपूरच्या वडिलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

सोशल मीडियावर आजकाल सगळेच सक्रिय असतात. त्यात कलाकार तर नेहमीच त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. अभिनेत्री सोनल चौहानही नेहमीच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट करत असते. अशातच तिने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर नेटकरी तसेच अनेक कलाकार देखील त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

सोनल चौहानने अलीकडेच सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ती बेडवर बसलेली दिसत आहे. यावेळी तिने ब्लॅक बिकिनी टॉप आणि रिप्ड जिन्स घातली आहे. या फोटोमध्ये ती बेडवर बसून पोझ देताना दिसत आहे. या फोटोशूटमधील आणखी एक फोटो सोनलने शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बेडवर झोपून केस सावरताना दिसत आहे. (Shahid Kapoor step father rajesh Khattar interesting comment on sonal chauhan black bikini photo )

तिचे हे बोल्ड अंदाजात काढलेले फोटो चाहत्यांना अक्षरशः वेड लावत आहेत. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आणि पुन्हा एकदा सूर्य मला किस करत आहे.” तिचे हे फोटो खूप वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या या फोटोवर अभिनेता शाहिद कपूरचे वडील राजेश खट्टर यांनी कमेंट केली आहे की, “हॅव ए सनी डे.” राजेश खट्टर हे शाहिद कपूरचे सावत्र वडील आहेत.

सोनलने इम्रान हाश्मीसोबत ‘जन्नत’ या चित्रपटात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिच्या अभिनयाचे सर्वत्र खूप कौतुक झाले. त्यानंतर ती ‘जन्नत गर्ल’ या नावाने सर्वत्र प्रसिद्ध झाली. परंतु त्यानंतर ती चित्रपटात काही खास कमाल करू शकली नाही. सध्या ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जन्नत’ फेम अभिनेत्री सोनल चौहानने बोल्ड लूकमधील फोटो केले शेअर; चाहत्यांकडून मिळतेय पसंती

-‘एका वेळचे जेवण तरी दे’, म्हणत मंदिराबाहेर गरिबांना बिस्कीट वाटणारी अभिनेत्री सोनल चौहान नेटकऱ्यांकडून ट्रोल

-वयाव्या २० व्या वर्षीच सोनल चौहान बनली होती ‘मिस वर्ल्ड टुरिझम’, वाढदिवशीच रिलीझ झाला होता तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट

हे देखील वाचा