Tuesday, March 24, 2026
Home बॉलीवूड शाहिद कपूरच्या बायकोचे मीरा राजपूतचे तुटलेले घड्याळ पाहून नेटकऱ्यांनी दिला ‘हा’ सल्ला

शाहिद कपूरच्या बायकोचे मीरा राजपूतचे तुटलेले घड्याळ पाहून नेटकऱ्यांनी दिला ‘हा’ सल्ला

कलाकार लोकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आणि प्रिय असतात. मात्र आजच्या काळात कलाकारांच्या पत्नी देखील लोकप्रियतेच्या बाबतीत मागे नाही. कलाकारांच्या तोडीस तोड स्टार्स वाईफ्स प्रसिद्ध असून, त्यांना देखील चांगले फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावर या सेलिब्रिटींच्या बाबतीत कधी काय ट्रेंडिंगमध्ये येईल याची कोणी काहीच शाश्वती देऊ शकत नाही. अगदी छोट्या गोष्टी देखील सेलिब्रिटींसाठी लाइमलाइट देण्यास पुरेशा ठरतात. आता शाहिद कपूरच्या बायकोचे मीरा राजपूतचेच घ्या.

मीरा राजपूत सोशल मीडियावर अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय देखील असते. ती नेहमीच तिच्या पोस्ट अपडेट करते. मीराला देखील मोठी फॅन फॉलोविंग आहे. शाहिदची पत्नी ही ओळख असलेल्या मीराने सोशल मीडियावर तिची एक वेगळी ओळख तयार केली आहे. तसे पहिले तर मीरा या ना त्या कारणांमुळे सतत लाइमलाईट्मधे असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्याच कारणामुळे प्रकाशझोतात आली आहे. (mira rajput defend the broken watch)

मीराने एक पोस्ट शेअर केली होती ज्यात तिचे तुटलेले घड्याळ दिसत होते. तिच्या या घड्याळावरून तिला आता ट्रोल केले जात आहे. शिवाय तिला नवीन घड्याळ घेण्याचे सल्ले देखील दिले जात आहे. तिच्या घड्याळावर तिला मिळणाऱ्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स पाहून मीराने तिची बाजू मांडली आहे. इन्स्टा स्टोरीवर एक मोठी पोस्ट शेअर करत तिने लिहिले, “लोकांचे लक्ष माझ्या घड्याळावर जरा जास्तच जात आहे. माझे घड्याळ बॉडी पॉझिटिव्ह असून, घड्याळ जरी तुटले असले तरी ते काम करत आहे. नेहमी घड्याळाची स्ट्रीप बदलावल्यानंतर ते एका नवीन लूकमध्ये येते. मी माझे घड्याळ फेकून देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा त्याकडे लक्ष देऊ नका.”

मीरा जरी चित्रपटसृष्टीचा भाग नसली तरी ती खूपच लोकप्रिय आहे. शाहिद कपूरची पत्नी असणारी मीरा अनेक मोठ्या ब्रॅंड्सचे प्रमोशन करते. मीरा नेहमीच तिच्या लूकसाठी ओळखली जाते. तिचे अनेक फोट बऱ्यापैकी सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसतात. मीराला २ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स सोशल मीडियावर फॉलो करतात.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा