आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने टिव्ही अभिनेत्री शहनाज गिलने (Shahnaaz Gill) चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. शहनाज तिच्या अभिनयाप्रमाणेच साध्या, सरळ आणि हळव्या स्वभावामुळेही लोकांची नेहमीच मने जिंकत असते. याचाच प्रत्यय सर्वांनाच ‘बिगबॉस’च्या कार्यक्रमात आला होता. कार्यक्रमात शहनाजच्या हळव्या मनाचे सर्वांनाच दर्शन झाले होते. याच तिच्या स्वभावावर अभिनेता सलमान खानही (Salman Khan) चांगलाच खुश झाला असून आपल्या आगामी कभी ईद कभी दिवाली चित्रपटासाठी त्याने शहनाजला मागेल तेवढी रक्कम देण्याची तयारी दर्शवली आहे. काय आहे हा किस्सा चला जाणून घेऊ.
पंजाबची कॅटरिना कैफ आणि ‘बिग बॉस 13’ ची स्पर्धक शहनाज गिल सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवणार आहे. शहनाज गिलसोबतच तिचे चाहतेही याबद्दल खूप उत्सुक आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातून शहनाज गिलला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. एवढेच नाही तर सलमान खानने शहनाज गिलला चित्रपटासाठी मागितलेली रक्कमही दिली आहे. शहनाज गिलशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहनाज गिलशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, “सलमान खानने शहनाज गिलला तिचे मानधन निवडण्याची संधी दिली आहे. याबद्दल शहनाज गिलची शैली आणि स्टाईल पाहून सलमान खानने तिला तिला ही संधी दिली आहे,शहनाज गिलच्या निस्वार्थी स्वभावाने सलमान खानला असे करण्यास भाग पाडले” असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात शहनाज गिल सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मासोबत दिसणार असल्याचेही मानले जात आहे. या संबंधित एक व्हिडिओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अभिनेत्री व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताना दिसत होती. त्या व्हिडिओमुळे शहनाज गिलने चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- काशी विश्वेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर ज्ञानवापी मस्जिद शिवलिंग दाव्यावर कंगना रणौत म्हणाली…
- ‘तुमचा हा इथला शेवटचा कार्यक्रम’, बालगंधर्व नाट्यगृहाबाबतची गायक मंगेश बोरगावकरची पोस्ट व्हायरल
- हिना खानच्या कान्स चित्रपट महोत्सवातील लूकने चाहते घायाळ, बॉलिवूड अभिनेत्रींना दिली जोरदार टक्कर