Kabhi Eid Kabhi Diwali | चित्रपटाच्या सेटवरून लीक झाला शहनाज गिलचा लूक, ‘या’ अवतारात दिसली अभिनेत्री

‘बिग बॉस १३’मध्ये दिसल्यानंतर रातोरात स्टार बनलेली शहनाज गिल (Shehnaaz Gill) लवकरच बॉलिवूडमध्ये धमाका करताना दिसणार आहे. शहनाज लवकरच सलमान खानच्या (Salman Khan) ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शहनाजच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चाहते खूप खूश होते. याच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘कभी ईद कभी दिवाली’ मधून शहनाज गिलचा लूक समोर आला आहे. व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताना एका फोटोग्राफरने शहनाजचा सुंदर लूक आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

चाहत्यांना नेहमीच शहनाजला काहीतरी मोठे करताना पाहण्याची इच्छा होती. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांचे हे स्वप्न साकार होत आहे, तेव्हा शहनाजला नव्या लूकमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत आम्ही तुम्हाला शहनाज गिलचा तो लूक दाखवणार आहोत, ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता. (shehnaaz gill first look from salman khan film gets leaked kabhi eid kabhi diwali)

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Kaur Gill (@ms.shehnaazkaurgill)

या व्हिडिओमध्ये केसात गजरा घातलेली शहनाज गिल तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून खाली उतरताना दिसत आहे. म्हणजेच तिने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. तसेच पेस्टल कलरची साडी परिधान केलेली शहनाज गिल दुरूनही सुंदर दिसत आहे.

या चित्रपटात शहनाज सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मासोबत (Ayush Sharma) दिसणार आहे. म्हणून असा अंदाज लावला जात आहे की, चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत शहनाजचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील होईल.

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शहनाज गिल जेव्हा २०१९ मध्ये ‘बिग बॉस १३’ मध्ये आली तेव्हा तिने स्वतःची ओळख ‘पंजाबची कतरिना कैफ’ अशी करून दिली. शोच्या शेवटी, शहनाजची जबरदस्त फॅन फॉलोइंग होती आणि ती सोशल मीडियावर लोकप्रिय झाली. आज शहनाज लाखो हृदयांवर राज्य करते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post