Monday, July 8, 2024

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला 27 वर्ष पूर्ण, आजच्या पिढीलाही भुरळ घालते सिमरन आणि राजची लव्हस्टोरी

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये असे थोडेच चित्रपट असतील जे मोठ्या काळापर्य चित्रपट गृहामध्ये टिकले असतील. आजच्या काळामध्ये दर आठवड्यामध्ये नवीन चित्रपट प्रदर्शित होतात मात्र, एकच आठवडा हा चित्रपट सगळ्यांना माहित असतो आणि नंतर हरवल्यासारखा होतो. पूर्वीचे चित्रपटांमध्ये वेगळीच मज्जा होती, ज्याची तुलना आजच्या चित्रपटासोबत होउ शकत नाही. अनेक वर्षापासून लोकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ याने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच रेकॉर्ड बनवला आहे.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगा हा एकमेव चित्रपट आहे, जो अधिक काळासाठी चित्रपट गृहामध्ये आपली जागा केली होती. आज या चित्रपटाला 27 वर्षे पूर्ण झाले आहेत. आजही या चित्रपटाचे गाणे आणि डायलॉग सतत चाहत्यांच्या तोंडात असतात. शाहरुख खान (Shahrukh Khan) याची गिटार वाजवण्याची स्टाइल आणि सेनोरिटा, असे अनेक डायलॉग आहेत ज्यांनी चाहत्यांना वेड लावले आहे. या चित्रपटाने प्रेम करण्याची पद्धतच बदलली होती. यामध्ये अनेक नात्यांना खूप छान प्रकारे चित्रित केले होते. या चित्रपटााच्या कथेने चाहत्यांना भुरळ घातली होती आणि आजही नवीन पीढीला भुरळ घालत आहे . चाहत्यांचा प्रतिसाद पाहून या चित्रपटाचे नाव सुपहिट लिस्टमध्ये नोंदवले होते. या चित्रपटामुळे शाहरुख खान आणि काजोल (Kajol) यांच्या जोडीने चाहत्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले होते. आजही हा चित्रपट लागला की, चाहते खूप आवडीने चित्रपटाचा अस्वाद घेत असतात

चित्रपट तज्ञ तरन आदर्श (Taran Adarsh) ट्वीट करत चित्रपटाचे 27 वर्ष पुर्ण होण्याची बातमी दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “डीडीएलजे चित्रपटाने आज 27 वर्ष पुर्ण केले आहेत. या चित्रपटाने हिंदी चित्रपटातील परिभाषा बदलली… राज आणि सिमरन, काजोलची प्रेम कहानी, अमरीश पुरी यांचा जबरदस्त अभिनय मधुर साउंडट्रे… #DDLJ आजही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे.”

या चित्रपटामध्ये काजोल एकदम संस्कारिक मुलगी दाखवली आहे, जी आपल्या वडीलांच्या प्रत्येक शब्दाचा मान ठेवते. तिच्यासाठी प्रेमापेक्षाही वडिलांचा आदर जास्त होता. राज हा एक उद्धट मुलगा होता, ज्याला आपल्या मर्जीनुसार जगने फार आवडत होते. जशा प्रकारे सिमरन आणि राज या भूमिका गाजल्या त्याचप्रकारे अमरीश पुरी याचीही भूमिका खूपच गाजली होती. आजही त्यांचा ‘जा सिमरन जी ले अपनी जिंदगी’ हा डायलॉग नेहमी चाहत्यांचा फेवरेट आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
खुशखबर! अनिल कपूर आणि माधूरी दिक्षितच्या ‘जमाई राजा’ चित्रपटाला 32 वर्ष पुर्ण, झाल्याबद्दल रिमेकची तयारी…
रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला ‘या’ मोठ मोठ्या कलाकारांनी लावली हजेरी, जाणून घ्या पूर्ण माहिती

हे देखील वाचा