Wednesday, March 22, 2023

आई काजोलसोबत मुलगा युगने भाविकांना वाढले जेवण; चाहते म्हणाले, “छोटा सिंघम…”

बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने नॉर्थ बॉम्बे सरबोजनीन येथे तिच्या कुटुंब आणि मित्रांसोबत दुर्गापूजा साजरी केली. काजोलने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर नवरात्रीच्या सातव्या दिवसाचा म्हणजेच सप्तमीच्या रात्रीचा व्हिडिओ
चाहत्यांनसोबत शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहे.

व्हिडिओमध्ये अभिनेत्री काजोल(Kajol ) हिचा मुलगा युग(Yug devgn) आपल्या परंपरांचा आदर करत पंडालमध्ये आलेल्या लोकांना प्रसाद देताना दिसत आहे. तिच्या मुलाला या रुपात पाहून काजोलचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. व्हिडिओमध्ये काजोलने सुंदर गुलाबी रंगाची साडी घातली आहे. तसेच तिचा मुलगा युग यानेही गुलाबी रंगाचा कुर्ता घातला आहे. या माय – लेकाच्या जोडीने दुर्गापूजा मंडपात आलेल्या लोकांना आनंदाने प्रसाद दिला. व्हिडिओमध्ये काजोलच्या हातात प्रसादाचे मोठे भांडे असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी, युग त्यातून लोकांना प्रसाद देत आहे.

काजोलला मुलाचा आहे अभिमान
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये काजोलने लिहिले की, “मला माझ्या मुलाचा खूप अभिमान आहे. ज्याने पूजाच्या चुका समजून घेतल्या आणि त्यांची सेवा केली… परंपरा सुरू आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोलचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना काजोलची बहीण तनिषा मुखर्जी हिने कमेंट करत हार्ट इमोजी टाकले आहे. त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले की, “छोट्या सिंघमची सेवा मिळाल्याने लोक आनंदी आहेत.” तर दुसर्‍या चाहत्याने लिहिले, “खूप गोड.”

काजोल बंगाली कुटुंबातून आली आहे. रविवारी (दि. 2 ऑक्टोबर)ला सकाळी पूजा पंडालमधून काजोलचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते, ज्यामध्ये ती तिच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत दुर्गापूजा साजरी करताना दिसली होती. या सेलिब्रेशनमध्ये काजोल तिची बहीण तनिषा आणि चुलत बहीण शरबानी मुखर्जीसोबत दिसली. यादरम्यान कोजलने तिचे काका देब मुखर्जी यांचीही भेट घेतली.

काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘त्रिभंगा’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रेणुका शहाणे यांनी केले आहे. यात काजोलसोबत तन्वी आझमी आणि मिथिला पालकरही महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. याशिवाय काजोल ‘सलाम वेंकी’मध्ये दिसणार आहे. ज्याची रिलीज डेट काजोलने आज जाहीर केली आहे. काजोलचा सलाम वेंकी हा चित्रपट 9 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
एकट्या करिनाला विमानतळावर पाहून चाहते झाले ‘अनकंट्रोल’, बेबोची पळताभुई थोडी, कुणी हात धरला तर कुणी…

बापरे..! टायगर श्रॉफला नक्की झालंय तरी काय? व्हिडिओ पाहून चाहते प्रचंड काळजीत, कारणही आलंय समोर

 

 

हे देखील वाचा