Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड एकेकाळी ‘देसी गर्ल’च्या प्रेमात होता शाहरुख खान, मग पत्नीला समजताच झाले असे काही

एकेकाळी ‘देसी गर्ल’च्या प्रेमात होता शाहरुख खान, मग पत्नीला समजताच झाले असे काही

बॉलिवूडचा रोमान्स किंग कोण बरं? असा सोप्पा प्रश्न विचारला, तर तुमच्याही तोंडात नाव येईल, ते म्हणजे शाहरुख खान. (shahrukh khan) यायलाच पाहिजे… कारण भावानं आपल्या फिल्मी करिअरमध्ये रोमँटिक मूव्हीजशिवाय वेगळ्या भूमिकांचे चित्रपट तसे कमीच केले. तो जेव्हा हात पसरवून त्याची सिग्नेचर पोझ देतो… तेव्हा लाखोच नाही, तर करोडो तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. पण याच रोमान्स किंगने लग्नाची थोडी घाईच केली. त्यानं रोमान्स किंग बनण्यापूर्वीच लग्नाचा बँड बाजा वाजवला होता. पण भावाला कुठं माहिती होतं, तो पुढं जाऊन रोमान्स किंग बनणारंय. पण तो झालाच. आता त्याच्याकडं लग्नासाठी लाखो मागण्या येऊ लागल्या होत्या. पण करणार काय या गड्याचं तर आधीच लग्न झालं होतं. तोही शेवटी माणूसच… कुठं ना कुठं माशी शिंकणारंच होती. त्याच्या आयुष्यात एन्ट्री केली, ती म्हणजे जगभरात आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने. (priyanka chopra)  आणि मग आपलं 15 वर्षांचं लग्न विसरून या ‘मिस वर्ल्ड’च्या सुंदरतेसमोर शाहरुख घायाळ झाला. आता यांच्या अफेअरबद्दलच आपण पाहूयात…

शाहरुख अन् प्रियांकाच्या जोडीनं सर्वांचंच लक्ष वेधलेलं. ते म्हणजे 2006 साली आलेल्या डॉन मूव्हीतून. या मूव्हीतील त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच भावली. चाहत्यांना त्यांची जोडी आवडली तर होतीच, पण कुठेतरी ऑफस्क्रीन शाहरुख अन् प्रियांकालाही एकमेकांची जोडी आवडू लागली होती. याचा खुलासा खुद्द किंग खानने एका इंटरव्ह्यूमध्ये केलेला. तो म्हणाला होता, ‘तो प्रियांकासोबत खूप कंफर्टेबल फील करतो. कारण तो जसा आहे, तसाच प्रियांकासोबत राहू शकतो.’ खरं तर, जेव्हा बोलता-बोलता प्रियांका शाहरुखचे केस नीट करायची… त्याच्या जवळ यायची, हे किंग खानला खूप आवडायचे. याच इंटरव्ह्यूमध्ये प्रियांकाही म्हणाली होती की, तिलाही शाहरुखची कंपनी खूप आवडते. यानंतर प्रियांका आणि शाहरुखमध्ये काहीतरी शिजतंय, अशी बातमी इंडस्ट्रीत आग लागलेल्या वणव्यासारखी तुफान पसरली. प्रत्येकजण या दोघांबाबत बोलू लागला. इतकंच नाही, तर असंही बोललं जातं की, शाहरुखने प्रोड्युसरला इथपर्यंत सांगितलं होतं की, त्याच्या प्रत्येक चित्रपटात त्याच्यासोबत प्रियांका चोप्रालाच कास्ट केले जावे. तसेच, त्याची कोणतीही पार्टी असेल, तर त्यात प्रियांकाला जरूर इनवाईट केले जावे. आणि झालंही तसंच…

शाहरुखचा जवळचा मित्र असलेल्या करण जोहरने जेव्हा एका पार्टीचे आयोजन केले, तेव्हा शाहरुखने त्याला म्हटले की, प्रियांकालाही इनवाईट करावे लागेल. खरं तर तेव्हा करणची प्रियांकाशी एवढी जास्त मैत्री नव्हती. पण त्याला शाहरुखला दुखवायचे नव्हते. त्यामुळे त्याने प्रियांकालाही त्या पार्टीत इनवाईट केले. पण मंडळी इथं किंग खानची पत्नी गौरी खानही होती बरं का… जशी प्रियांका पार्टीत आली, तसा शाहरुख तिच्यापुढे आला आणि तिची सर्वांशी ओळख करून देऊ लागला. हे सर्व गौरी पाहतच होती. त्यावेळी ती काहीच बोलली नाही. आणि आपल्या आतमध्ये उसळत असलेला वणवा तिने तिथंच शांत केला.

शाहरुख आणि प्रियांकाला प्रत्येक मूव्हीत आणि ऍडमध्ये एकमेकांसोबतच काम करायचं होतं. त्यांनी ते केलेही… यादरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. शाहरुख प्रियांकाच्या प्रेमात इतका बुडाला होता की, तो हेही विसरला की, त्याला पत्नी असून दोन-दोन मुलंही आहेत…

प्रियांका आता गौरीसोबतही मैत्री करण्याचा प्रयत्न करू लागली होती. तिला माहिती होतं की, इंडस्ट्रीत वर- वर जायचंय, तर गौरी खान ही योग्य शिडी आहे. आणि शाहरुख तर आधीच तिचा जवळचा मित्र होता. यादरम्यानच प्रियांकाला चांगले मूव्हीजही मिळाले. जसे की, दोस्ताना, अंजाना- अंजानी… यानंतर प्रियांकाच्या यशाचा आलेख वाढतच राहिला. तसेच दुसरीकडे तिचे आणि शाहरुखचे नाते खुलू लागले होते. ते एकेमकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. सोशल मीडियाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले, ज्यात ते दोघेही एकमेकांसोबत कंफर्टेबल असल्याचे दिसले. एकतर फोटो असा व्हायरल झाला होता, ज्यात प्रियांका शाहरुखच्या खिशात हात घालून उभी होती. ही बातमी उडत- उडत गौरी खानकडं गेली.

आता गौरी मात्र प्रियांकाशी इनसेक्यूर झाली होती. तिला वाटलं होतं की, प्रियांकामुळं आपलं लग्न मोडू शकतं. त्यामुळं आता गौरीने करण जोहर आणि करीम मोरानी यांना त्यांच्या फ्यूचर आणि करंट प्रोजेक्टमध्ये प्रियांकाला कास्ट न करण्यास सांगितले. तसेच करण जोहरने हे गांभीर्यानंही घेतलं.

दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात शाहरुख प्रियांकाला ‘मॅरी मी’ म्हणताना दिसला होता. हे पाहून गौरीच्या तळपायाची आग मस्तकात नक्कीच गेली असणार… यानंतर गौरीला समजलं की, शाहरुख आणि प्रियांकामध्ये काहीतरी शिजतंय… त्यामुळे तिने शाहरुखला थेट घटस्फोटाची धमकीच दिली होती. तसेच शाहरुख काहीही करू शकत होता, पण तो आपल्या बालपणीचं प्रेम असलेल्या गौरीला सोडू शकत नव्हता. असं असलं तरीही 2011 साली डॉन 2 मूव्ही आला आणि त्यात प्रियांका आणि शाहरुखची जोडी पुन्हा झळकली. यांची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या पसंतीस पडली. पण हे गौरीला कुठेतरी खटकलं. तिला शाहरुखसोबत प्रियांकाला काम करू द्यायचं नव्हतं. असं म्हटलं जातं की, बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये प्रियांकानं जी काही प्रसिद्धी मिळवलीय, त्यामागं शाहरुखचाच हात आहे. आता खरं काय हे त्या शाहरुख आणि प्रियांकालाच माहिती बघा…

विशेष म्हणजे, एका परफॉर्मन्ससाठी शाहरुख दुबईला पोहोचला होता. तिथं प्रियांकाची काहीच गरज नव्हती. पण तरीही शाहरुखला भेटण्यासाठी प्रियांका तिथे गेली होती. मंडळी… असंही म्हटलं जातं की, या दोघांनी गुपचूप लग्न केलं होतं. यामागील कारण होतं प्रियांकाच्या वडिलांची बिघडलेली तब्येत. प्रियांकाच्या वडिलांची शेवटची इच्छा असल्यामुळेच कदाचित शाहरुखने प्रियांकासोबत गुपचूप लग्न केलं होतं… पण यामध्ये किती सत्यता आहे, हे त्या दोघांनाच माहिती.

त्यानंतर एका शोमध्ये प्रियांका एक जॅकेट घालून पोहोचली होती. तिथं तिनं सांगितलं होतं की, ते जॅकेट तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं आहे. असंच जॅकेट शाहरुखही घालताना दिसला होता. यावरूनही त्यांच्यातील प्रेम दिसून येते. मात्र, नंतर दोघांनीही आपापल्या वाटा निवडल्या. प्रियांका हॉलिवूडमध्ये सेट झाली आणि यशाचे शिखर चढतच राहिली. तिनं 2018 साली अमेरिकन गायक निक जोनाससोबत संसार थाटलाय.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
अभिनेता शाहरुख खानने हटवली मन्नत बंगल्याची 25 लाखाची नेमप्लेट, समोर आले हे कारण
जेव्हा बॉलिवूड निर्मात्याने केला होता शाहरुख खानचा अपमान म्हणाला, ‘तू बॉक्स ऑफिसवर चालणार नाहीस’

हे देखील वाचा