Thursday, September 17, 2026
Home बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने हटवली मन्नत बंगल्याची 25 लाखाची नेमप्लेट, समोर आले हे कारण

अभिनेता शाहरुख खानने हटवली मन्नत बंगल्याची 25 लाखाची नेमप्लेट, समोर आले हे कारण

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याच्या अभिनयासाठी जितका प्रसिद्ध आहे. तितकीच त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याचीही मोठी चर्चा होत असते. त्याचा प्रत्येक चाहता त्याच्या निवासस्थानाला भेट देऊन न चुकता फोटो काढत असतो. त्यामुळेच शाहरुख खानचे हे निवासस्थान चांगलेच चर्चेत असते. मात्र शाहरुख खानच्या निवासस्थानाची खरी ओळख असलेले मन्नत हे नाव त्याच्या बंगल्यावरुन हटवल्याची माहिती समोर आली आहे.या बातमीने शाहरुख खानच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. काय आहे या मागील कारण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, काही दिवसांपासून शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. विशेषता शाहरुख खानच्या बंगल्याची खरी ओळख असलेल्या मन्नत या पाटीची जोरदार चर्चा झाली होती. काही माध्यमांनी या नेमप्लेटची किंमत 25 लाख रुपये असल्याच्या बातम्या दिल्या होत्या. तेव्हापासून या चाहत्यांमध्ये याबद्दलचे कुतूहल निर्माण झाले होते.मात्र आता या नेमप्लेटबद्दल धक्कादायक माहिती समोर आली असून शाहरुख खानच्या बंगल्याची खरी ओळख असलेली ही पाटी हलवण्यात आली आहे.

शाहरुख खानच्या टिमकडून याबाबत स्पष्टिकरण देताना नेमप्लेटमधील हिरे निखळल्याने त्याला पून्हा डिजायन करण्यासाठी हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या नेमप्लेटची संपूर्ण डिजायन शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केली आहे. त्यामुळे आता पून्हा लवकरच शाहरुखच्या मन्नतची खरी ओळख असलेली ही नेमप्लेट नव्या रुपात चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान अभिनेता शाहरुख खानचा बंगला बांद्राभागात आहे. या बंगल्याची खासियत म्हणजे जगभरातील चाहते या बंगल्याला भेट देण्यासाठी येत असतात. बंगल्या बाहेर लावलेली मन्नत लॅंड्स एन्ड ही नेमप्लेट सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
जेव्हा बॉलिवूड निर्मात्याने केला होता शाहरुख खानचा अपमान म्हणाला, ‘तू बॉक्स ऑफिसवर चालणार नाहीस’
…म्हणून शाहरुख खान करत नाही अक्षय कुमारसोबत काम, अभिनेत्याने स्वतः केला मोठा खुलासा

हे देखील वाचा