Sunday, March 8, 2026
Home बॉलीवूड वाढदिवसानिमित्त जाणून घ्या किंग खानचे आगामी ७ प्रोजेक्ट्स, निर्मात्यांनी लावलेत कोट्यवधी रुपये

वाढदिवसानिमित्त जाणून घ्या किंग खानचे आगामी ७ प्रोजेक्ट्स, निर्मात्यांनी लावलेत कोट्यवधी रुपये

रोमान्सचा किंग शाहरुख खानने मंगळवारी (२ नोव्हेंबर) त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा केला. २ नोव्हेंबर, १९६५ साली दिल्लीमध्ये जन्मलेल्या शाहरुखला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. या दरम्यान त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्याचे जवळपास सगळेच चित्रपट सुपरहिट झाले आहेत. तो शेवटचा २०१८ मध्ये ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. चला तर त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याच्या आगामी चित्रपटाबाबत…

पठाण
शाहरुख खानचा सगळ्यात बहुप्रतिक्षित चित्रपट हा ‘पठाण’ आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, शाजी चौधरी हे कलाकार दिसणार आहेत. (Shahrukh Khan birthday special : let’s know about his upcoming movies list)

लायन
शाहरुख खान आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक एटली कुमार यांचा आगामी ‘लायन’ या चित्रपटावर देखील त्यांनी करोडो रुपये लावले आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा ही अभिनेत्री दिसणार आहे.

सनकी
शाहरुख ‘सनकी’ या चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण असणार आहे.

ब्रह्मास्त्र
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात देखील शाहरुख खान दिसणार आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाबाबत प्रेक्षकमध्ये खूप उत्सुकता आहे.

रॉकेट्री : द नंबी इफेक्ट
आर माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटात शाहरुख खानचे खास आकर्षण असणार आहे. हा चित्रपट भारतीय वैज्ञानिक नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित असणार आहे

ओटीटी प्रोजेक्ट
शाहरुख खानने ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारसोबत एका प्रोजेक्टसाठी हात मिळवला आहे. मात्र, याबाबत जास्त काही माहिती समोर आली नाही. कदाचित ही नवीन वेबसीरिज असू शकते.

शाहरुख खान राजकुमार हिरानीसोबत एक नवीन चित्रपट घेऊन येणार आहे. हा चित्रपट पंजाबच्या डंकी फ्लाईट मुद्यावर आधारित आहे. हा एक विनोदी चित्रपट असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ हजार रुपये घेऊन गौरीच्या शोधात मुंबईत आला होता शाहरुख, तर आज वर्षाला कमावतो ‘इतके’ कोटी

-जेव्हा करण जोहरने विचारला होता ‘न्यूड पोझ’बाबत प्रश्न, शाहरुख खानचे उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

-खरंच की काय! अभिनयामुळे नव्हे, तर नाकामुळे मिळाला होता ‘किंग खान’ला पहिला चित्रपट

हे देखील वाचा