Wednesday, October 9, 2024
Home बॉलीवूड गुपित झाले उघड! ‘टायगर 3’ मधील शाहरुखचा कॅमिओ सीन लीक, पठाणच्या मदतीने टायगर करणार पलायन

गुपित झाले उघड! ‘टायगर 3’ मधील शाहरुखचा कॅमिओ सीन लीक, पठाणच्या मदतीने टायगर करणार पलायन

शाहरुख खानच्या ‘पठाण’ सिनेमाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला. बऱ्याच वर्षांनी शाहरुखला मोठे यश पाहता आले. या सिनेमाचे सर्वात मोठे आकर्षण होते सिनेमातील सलमान खानची पाहुण्या कलाकाराची भूमिका. या सिनेमाच्या निमित्ताने शाहरुख आणि सलमानला या पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळाली. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर हे दोघं पुन्हा एकत्र दिसणार असल्याच्या तुफान चर्चा रंगल्या होत्या. सलमानच्या आगामी ‘टायगर ३’मध्ये शाहरुख भूमिका साकारणार असल्याचे सर्वानाच माहित होते. ‘टायगर ३’मध्ये खुद्द शाहरुख खान कॅमिओ करणार ही हिंट त्याच्या ‘पठाण’ चित्रपटात दिली

पुढे शाहरुख खान सलमानच्या टायगर ३मध्ये दिसणार हे नक्की झाल्याचे समजले. आता लवकरच शाहरुख खान त्याच्या या कॅमिओचे शूटिंग करणार असल्याचे सांगितले जात आहे. आता सलमानच्या सिनेमात शाहरुखची एन्ट्री, त्याची भूमिका त्याचा रोल कसा असेल याची उत्सुकता अनेकांच्या मनात आहे. मात्र आता यावर उत्तर मिळाले आहे. या साणमातील शाहरुखच्या भूमिकेबद्दल एक माहिती समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

टायगर ३मध्ये शाहरुख सलमानला तुरुंगातून पळून जाण्यास मदत करताना दाखवला जणार असल्याचे समजत आहे. या सिनेमात टायगरला तुरुंगातून पळून जावे लागते. तिथेच पठाण त्याच्या मित्राच्या मदतीला धावून येतो असे दिसणार आहे. एवढेच नाही तर या सीनमध्ये लोकप्रिय भारतीय जिम्नॅस्टही दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या जिम्नॅस्टची भूमिका खलनायकाची असून, त्याच्याशी तुरुंगात भांडण केल्यानंतर शाहरुख आणि सलमान तुरुंगातून पळून जातात असे दाखवले जाणार आहे.

दरम्यान टायर ३ या सिनेमाची बऱ्याच महिन्यांपासून चर्चा आहे. यात पुन्हा एकदा सलमान आणि कॅटरिना मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर इमरान हाश्मी खलनायक म्हणून दिसेल. हा सिनेमा दिवाळीमध्ये प्रदर्शित होईल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

‘मैत्रीत जाणीव पाहिजे आणि…’ सुनील शेट्टीने सलमान आणि त्याच्या नात्यावर भाष्य

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा