Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

फटाके अन् ढोल-ताशाच्या गजरात शहरुख खानच्या पठाण चित्रपटाचं दणक्यात स्वागत, पाहाच व्हायरल व्हिडिओ

शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाची आतुरता अखेर संपली. बुधवार (दि, 25 जानेवीरी) रोजी पठाण प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चाहत्यांनी सिनेमागृहाच्या बाहेर राडा केला आहे. कोरोनानंतर पहिल्यांदा कोणत्या चित्रपटासाठी चाहत्यांप्रती एवढी क्रेज पाहायला मिळत आहे. पठाणने प्रदर्शानपूर्वीच कोट्यावदीचा गल्ला जमवला आहे. भारतात जवळपास ८ लाखांपेक्षा अधिक तिकिटं बुक करण्यात आली आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपट पाहाणाऱ्या चाहत्यांनी सिनेमागृहाच्या बाहेर राडा केला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आज शाहरुख खान (Shaharukh Khan) याचा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून सर्वत्र हाउसफुलचे बोर्ड लागले आहेत. अशातच शाहरुखच्या चाहत्यांनी चित्रपट पहाण्यापूर्वी सिनेमागृहाबाहेर राडा घातला आहे. तब्बल 4 वर्षानंतर शाहरुख परतनार म्हटल्यावर देशभरातील चित्रपटगृहांबाहेर एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. सकाळी 7 वाजता शो पाहाण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळत असून याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

काहींनी तर सिनेमागृहाच्या बाहेर चक्क फटाके फोडले आहेत, तर काही ठिकानी ढोल-ताशांच्या गजरात चित्रपटाचं स्वागत करत आनंदाने नाचताना दिसत आहेत. शाहरुखच्या बऱ्याच दिवसानंतर मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी चाहत्यांनी दाखवलेली उत्सुकता कमालीचा आहे. पहिल्याच दिवशी चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक वर्षानंतर चित्रपटांसाठी अशी गर्दी पाहाला मिळत आहे.

पठाण’ला मिळत असलेला प्रतिसाद पाहून असे दिसून यते आहे की, चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार. तर दुसरीकडे दीपिका पादुकोन (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (Jon Abraham) यांच्या भूमिकेचंही सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सुरुवातीला या चित्रपटाबाबत बरेच वाद रंगले. मात्र, त्याचा चित्रपटावर कोणताच परिणाम झाला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा-दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री रेखा यांच्यामुळे आलेल्या दडपणामुळे करिश्मा कपूर ‘जुबेदा’ सिनेमा करण्यासाठी देत होती नकार
ओळखलत का या बॉलिवूड अभिनेत्रीला? लाखो लकांच्या मनावर करतेय राज्य

हे देखील वाचा