Friday, April 19, 2024

अभिनेत्री रेखा यांच्यामुळे आलेल्या दडपणामुळे करिश्मा कपूर ‘जुबेदा’ सिनेमा करण्यासाठी देत होती नकार

प्रत्येक अभिनेत्रींच्या करियरमध्ये त्या अनेक सिनेमे करतात आणि त्या सिनेमांमधून त्यांना ओळख मिळते. मात्र प्रत्येकीच्या आयुष्यात असा एक सिनेमा असतो जो तिच्या संपूर्ण करियरला एक चांगली कलाटणी देतो आणि टॉपला जाऊन बसतो. अभिनेत्री करिश्मा कपूरने देखील तिच्या सौंदर्याने आणि तिच्या अभिनयाने ९० चे दशक गाजवले. तिने देखील तिच्या करियरमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. असाच तिच्या करियरमधील एक सिनेमा म्हणजे ‘जुबेदा’. हा करिश्माच्या करियरमधील सर्वात उत्तम सिनेमा म्हणून ओळखला जातो.

‘जुबेदा’ सिनेमासाठी जेव्हा जेव्हा करिश्माला विचारणा झाली तेव्हा तिला स्क्रिप्ट तर आवडली आणि तिने होकार पण दिला. मात्र ती खूप घाबरली होती. तिच्या घाबरण्याची दोन दोन कारणं होती. एक म्हणजे ‘जुबेदा’ सिनेमात रेखा आणि मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत होते. दोघेही कमालीचे प्रतिभावान कलाकार. दुसरे कारण म्हणजे हा सिनेमा आणि यातील ‘जुबैदा बेगम’ ही भूमिका आधी मनीषा कोईरालाला ऑफर झाला होता, मात्र रेखा यांच्यासारख्या दमदार अभिनेत्रीला मनीषा तिच्या सवतीच्या रूपात पाहू शकत नव्हती. त्यामुळे तिने या भूमिकेला नकार दिला. जेव्हा हीच भूमिका करिश्माकडे गेली तेव्हा ती देखील याच कारणामुळे घाबरत होती. तिने याआधी अशी गंभीर भूमिका नव्हती केली.

करिश्मा या भूमिकेसाठी स्वतःला तयारच करू शकत नव्हती. म्ह्णूनच हा सिनेमा साईन करण्यासाठी तिने बराच काळ घेतला. मात्र जेव्हा ती सेटवर पोहचली आणि रेखा यांना पाहिले, त्यांचे वागणे पाहिले तेव्हा तिला थोडे बरे वाटले. जेव्हा रेखा यांनी करिश्माला देखील अगदी लहान मुलीसारखं ट्रीट करायला सुरुवात केली, तेव्हा ती जरा रिलॅक्स झाली. करिश्माने एका मुलाखतीमध्ये सांगितले देखील होते की, “रेखा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच सुंदर होता.” पुढे जुबेदा हा सिनेमा समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी चांगलाच उचलून धरला. करिश्माच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक झाले. शिवाय सिनेमातील गाणी देखील हिट झाली.

हेही वाचा-दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Oscar Nomintaions 2023: भारतामधील ‘नाटू नाटू’ गाण्याशिवाय ‘या’ डॉक्युमेंट्रीलाही जाहीर ऑस्कर नामांकन
‘मी अक्षरशः मला विसरते…’ म्हणत मधुराणी प्रभुलकरने शेअर केली तिला स्वतःचाच विसर पडणाऱ्या गोष्टीची पोस्ट

हे देखील वाचा