Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या डिजिटल राईट्सचा ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत झाला सौदा, किंमत ऐकून व्हाल स्तब्ध

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या डिजिटल राईट्सचा ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत झाला सौदा, किंमत ऐकून व्हाल स्तब्ध

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) सध्या त्याच्या मोस्ट अवेटेड ‘पठान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र किंग खानने त्याचे प्रमोशन सुरू केले आहे. त्याच्या चित्रपटाशी संबंधित अनेक अपडेट्स समोर येत असतात. आता ताजी बातमी अशी आहे की, त्याच्या पठाण या चित्रपटाच्या डिजिटल राइट्सची डीलही झाली आहे. ही डील करोडोंमध्ये फायनल झाली आहे, जी ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.

शाहरुख खान प्रदीर्घ काळानंतर ‘पठाण’ चित्रपटातून पुनरागमन करत आहे. विशेष म्हणजे यावेळी किंग खान ‘ओम शांती ओम’ नंतर दुसऱ्यांदा दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, निर्मात्यांना पठाणच्या डिजिटल अधिकारांसाठी मोठी रक्कम मिळाली आहे. चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमसोबत पठाणच्या हक्कांसाठी २०० कोटींहून अधिकचा करार केला आहे. तथापि, अद्याप याविषयी निर्माते किंवा शाहरुख खानकडून कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

‘पठाण’बद्दल बोलायचे झाले तर, त्यात शाहरुखचा लूक खूपच दमदार असणार आहे. त्याच्या आणि दीपिकाशिवाय अनेक अनुभवी कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया, आशुतोष राणा, जॉन अब्राहम आणि सलमान खान देखील दिसणार आहेत.

शाहरुख खान जवळपास तीन वर्षांनंतर पडद्यावर पुनरागमन करत असला तरी रिपोर्टनुसार, त्याच्या हातात सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तो एटली कुमारचा ‘लायन’ आणि राजकुमार हिरानीचा ‘डंकी’ चित्रपटात काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा