×

जेव्हा शाहरुख खानच्या ‘जोश २’साठी झाले होते खोटे ऑडिशन, आख्खा दिवस रांगेत उभा होता सिद्धांत चतुर्वेदी

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने (Siddhant Chaturvedi) अत्यंत कमी वेळात आपल्या अभिनयाने सर्वांना आकर्षित केले आहे. मोजक्याच भूमिका साकारून सिद्धांतने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे त्याची चित्रपट जगतात प्रतिभावान नवोदित अभिनेता म्हणून ओळख निर्माण झाली आहे. सिद्धांतने चित्रपटात येण्यासाठी बराच संघर्ष केला. यावेळी त्याने एका चित्रपटासाठी नकली ऑडिशन सुद्धा देऊन आला होता. स्वतः सिद्धांतने याबद्दलचा खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddhant Chaturvedi (@siddhantchaturvedi)

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सध्या ‘गहराइयां’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपट पडद्यावर चमकदार कामगिरी करू शकला नसली, तरी चित्रपटातील सिद्धांतच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. चित्रपटात येण्यासाठी बराच काळ संघर्ष केलेल्या सिद्धांतने शाहरुख खानच्या (Shahrukh khan) एका चित्रपटासाठी सुरू असलेल्या नकली ऑडिशनमध्ये सहभाग घेतला होता. याबद्दल सिद्धांतने अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना गौप्यस्फोट केला होता.

View this post on Instagram

A post shared by Siddhant Chaturvedi (@siddhantchaturvedi)

याबद्दल बोलताना सिद्धांतने सांगितले की, “मी सुद्धा एकदा नकली ऑडिशनमध्ये फसलो होतो. त्या ठिकाणी खूप तरुण ऑडिशनसाठी रांगेत उभे होते. ज्यावेळी तिथे चौकशी केली, तेव्हा मला सांगण्यात आले की या ठिकाणी शाहरुख खानच्या ‘जोश २’ चित्रपटासाठी ऑडिशन सुरू आहे. हे ऐकून मी सुद्धा त्या रांगेत जाऊन उभा राहिलो.” या रांगेत उभे राहिल्यानंतर दिवसभर काही सिद्धांतचा नंबर आला नाही. जेव्हा तो दुसर्‍या दिवशी पुन्हा गेला तिथे कोणीही नव्हते. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्याचे लक्षात आले. मात्र आता सिद्धांतने आपल्या अभिनयाने चित्रपट क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post