×

सोशल मीडियावर व्हायरल झाला शाहरुख खानचा नवीन लूक, फोटो पाहून फॅन्स म्हणाले ‘पठाण’चा नवीन लूक

बॉलिवूडचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचे संपूर्ण जगात कोट्यवधी चाहते आहेत. त्याने त्याच्या रोमॅंटिक हिरोच्या इमेजने प्रत्येक पिढीतील लोकांच्या मनात एक कायमस्वरूपी असे स्थान निर्माण केले. मात्र मागील बरीच काळापासून शाहरुख मोठ्या पडद्यापासून लांब आहे. त्याचा एकही सिनेमा २०१८ नंतर प्रदर्शित झाला नाही. शिवाय मधल्या काही काळापासून तर तो सोशल मीडियापासूनही लांब आहे. यामुळे तिचे फॅन्स त्याला नवीन प्रोजेक्टमध्ये बघण्यासाठी खूपच उत्सुक आहे. यातच सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत असून, या फोटोमध्ये त्याचा नवीन लूक पाहायला मिळत आहे.

इंस्टाग्रामच्या अनेक शाहरुख खान फॅन पेजवरून त्याचा हा न पाहिलेला आणि हटके लूकमधला फोटो शेअर केला जात आहे. या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये शाहरुख खानने काळ्या रंगाचा टक्सीडो घातला असून, त्याचे फोटोमध्ये लांब केस आणि सॉल्ट एंड पेपर दाढ़ी दिसत आहे. या लूकमध्ये तो खूपच डॅशिंग दिसत असून, त्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी हा फोटो त्याच्या आगामी ‘पठाण’ सिनेमातील लुकचा असल्याचे सांगितले आहे, तर काहींनी त्याचा हा फोटो नवीन जाहिरातीचा असल्याचे सांगितले आहे.

मात्र हा फोटो नाही त्याचा ‘पठाण’ सिनेमातील लुकचा आहे आणि नाही नवीन जाहिरातीचा. हा त्याचा जुना फोटो असून, जो सध्या वाऱ्यासारखा इंटरनेटवर पसरत आहे. २०१७ साली सेलिब्रिटी फोटोग्राफर असणाऱ्या डब्बू रत्नानीने शाहरुखचे फोटोशूट केले होते, तेव्हाचा हा फोटो आहे. या जुन्या फोटोला फोटोशॉप केले असून, हा एडिटेड फोटो सध्या व्हायरल होत आहे. शाहरुख खानचा हा एडिटेड फोटो त्याच्या फॅन्सला चांगलाच आवडत असून, यात असलेले त्याचे लांब केस देखील सर्वांना आकर्षित करत आहे. या फोटोवर कमेंट्स करत नेटकाऱ्यानी लिहिले आहे की, “शाहरुखच्या या अनोख्या आणि कधीही न पाहिलेल्या लूकमुळे आम्ही स्पीचलेस झालो आहोत.” तर एकाने लिहिले, “तुझा हा लूक पाहून आम्ही तुझ्या प्रेमात पडलो आहोत.”

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास त्याला २०१८ साली आलेल्या ‘जिरो’ सिनेमात अखेरचे पाहिले होते. आता लवकरच तो ‘पठाण’ सिनेमात दिसणार असून, या सिनेमात त्याच्यासोबत दीपिका आणि जॉन अब्राहम दिसणार आहे.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

Latest Post