अखेर आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. सकाळपासून सुरु असणाऱ्या या प्रकरणात आर्यन खानचे नाव आल्यानंतर सर्वांचे डोळे मोठे झाले होते. २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर छापेमारी करत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र आता आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ही कारवाई करत त्याला अटक केली. आर्यनसोबत त्याचा मित्र असणाऱ्या अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांनाही अटक करण्यात आली. या अटकेनंतर त्या तिघांना एनसीबीच्या टीमने कोर्टात हजर केले. आर्यनचे वकील सतीश मानशिंदे आणि इतर दोघांचे वकील यांनी या तिघांच्या जामिनासाठी विचारणा देखील केली.
मात्र कोर्टाने एनसीबीने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारावर आर्यन आणि त्याच्या दोन मित्रांना एका दिवसाची कस्टडी ठोकली आहे. तत्पूर्वी एनसीबीने आर्यन आणि त्याच्या मित्रांची दोन दिवसांची कस्टडी मागितली होती. मात्र मानशिंदे यांनी कोर्टात सांगितले की, आर्यनने कोणत्याही प्रकारच्या ड्रग्जचे सेवन केले नाही. यांच्याकडे देखील काही उपलब्ध झाले नाही. आर्यनला त्या पार्टीत आमंत्रण दिले होते. व्हीआयपी गेस्ट म्हणून त्याला आमंत्रित केले होते.

मात्र कोर्टाने आर्यन, नेहा आणि अरबाज या तिघांना आज एनसीबी कस्टडी दिली असून, आजची ३ ऑक्टोबरची रात्र शाहरुख खानचा मुलगा एनसीबीच्या कस्टडीमध्ये काढणार आहे. एनसीबीने आर्यन आणि त्याच्या मित्रांचा मोबाइल जप्त केला असून, त्यात या पार्टीबद्दल आणि ड्रग्जबद्दल असलेले सर्व चॅट एनसीबीने पुन्हा मिळवले असून, त्या चॅटच्या माध्यमातून आता एनसीबी ड्रग पॅडलरपर्यंत पोहचण्याचा पर्यंत करत आहे. माध्यमातील बातम्यांनुसार आर्यनच्या मोबाइलमधून एनसीबीला ड्रग्सज संदर्भात काही महत्वाची माहिती मिळाली असल्याचे संगितले जात आहे. एनसीबीने कोर्टात आर्यनची दोन दिवसांच्या कस्टडीची मागणी केली आहे.
आर्यनला सकाळीच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. एनसीबीने त्यांच्या ऑफिसमध्ये आर्यन आणि त्याच्या मित्रांची ४ तासांपेक्षा अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर त्या तिघांना जेजे हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्टसाठी नेण्यात आले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप
-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक
-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ