Tuesday, July 9, 2024

ब्रेकिंग! आर्यनबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; २० ऑक्टोबरपर्यंत जेलमध्येच राहणार शाहरुखचा मुलगा

आर्यन खानसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा होता. २ ऑक्टोबरपासून ताब्यात असणाऱ्या आर्यन खानला आजही दिलासा मिळाला नाहीये.  आज १४ ऑक्टबरला झालेल्या सुनावणीमध्ये जामीन मिळेल असे अनेकांना वाटत होते मात्र आजही त्याच्या पदरी निराशाच पडली. कोर्टाने आर्यनचा जामीन अर्जावरचा निर्णय राखून ठेवला असून, २० ऑक्टोबरला या जामीन अर्जावरचा निर्णय देण्यात येणार असून, अजून सहा दिवस आर्यन जेलमध्येच राहणार आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर गुरुवारी (१४ ऑक्टोबर) सुनावणी पार पडली. खरं तरं ही सुनावणी बुधवारी होणार होती परंतु काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. या सुनावणीमध्ये आर्यनला कोर्टाने दिलेल्या निर्णयात त्याच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला आहे.

Photo Courtesy: Instagram/gaurikhan

 

२ ऑक्टोबरला मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवरच्या एका पार्टीमध्ये आर्यन खानला पकडण्यात आलं होतं. तेव्हापासून आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात आहे. आजच्या सुनावणीवेळी आर्यन खानचे वकील असणारे अमित देसाई, सतीश मानशिंदे आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी कोर्टात उपस्थित होते. आजच्या जामीन याचिकेवर सुनावणी आधी एनसीबीने त्यांची बाजू कोर्टात मांडत सांगितले की, “प्रत्येक आरोपीची या केसमध्ये वेगवेगळी भूमिका आहे. जरी आर्यनकडे अं’मली पदार्थ सापडले नसले तरी, तो पेडलरच्या संपर्कात होता. ही खूपच मोठी गोष्ट आहे. याची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे. आर्यनवर कॉन्ट्राबँड खरेदी केल्याचा आरोप आहे. हे कॉन्ट्राबँड आर्यनचा मित्र असणाऱ्या अरबाज मर्चंटकडून ताब्यात घेण्यात आले होते. हे संपूर्ण इंटरनॅशनल रॅकेट असल्याने यासर्व प्रकरणाची खोलवर चौकशी होण्यासाठी आर्यन खान आणि इतरांची रिमांड वाढवून मिळावी.”

कोर्टाने हे सर्व मुद्दे समोर ठेवत त्याला हा जामीन नाकारला आहे. शाहरुख खानने आर्यनला जामीन मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या सतीश मानेशिंदे यांच्यासोबत आर्यनची बाजू मांडण्यासाठी अमित देसाई या नवीन वकिलांची देखील नियुक्ती केली होती.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुखच नाही, तर त्याच्यासारखा दिसणारा व्यक्तीही संकटात; आर्यनच्या अं’मली पदार्थ प्रकरणानंतर मिळत नाहीये काम

-ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा किंग खानला पाठिंबा; म्हणाले, ‘…इंडस्ट्रीमध्ये सर्व भित्र्या व्यक्ती’

-सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

हे देखील वाचा