Tuesday, August 5, 2025
Home अन्य मोठी बातमी! आर्यन खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मोठी बातमी! आर्यन खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात अडकला होता. त्याला शनिवारी (२ ऑक्टोबर) नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) ताब्यात घेतले होते. यानंतर तो गुरुवारपर्यंत (७ ऑक्टोबर) एनसीबीच्या कोठडीत होता. त्यावर आणखी तपास करण्यासाठी एनसीबीने कोठडी वाढवून मागितली होती. मात्र, आता त्याच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. न्यायालयाने एनसीबीची मागणी अमान्य करत आर्यन खानसह इतर ७ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विशेष म्हणजे आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याने आणि उशीर झाल्यामुळे आर्यनला त्याची आजची रात्र ही त्याला न्यायालयीन कोठडीत काढावी लागेल. मात्र, आर्यन आणि इतरांच्या वकिलांकडून त्यांचा जामीन अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर शुक्रवारी (०८ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता या प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता आर्यनला त्याची आजची रात्र कोठडीत घालवाली लागणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून या प्रकरणाबाबत माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा आहे. आर्यनला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यामध्ये मिका सिंगपासून ते ऋतिक रोशनपर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे.

नुकतेच ऋतिकने एक भले मोठे पत्र लिहीत आर्यनला पाठिंबा दर्शवला होता. त्याने आर्यनसाठी प्रेरणादायी पत्र लिहिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘प्रिय आर्यन…’, ऋतिक रोशनचा आर्यन खानला खुल्या पत्राद्वारे पाठिंबा; वाचा काय लिहिलंय पत्रात

-‘त्या’ व्हिडिओत सलमानने दिलेले वचन केले पूर्ण; शाहरुख संकटात असताना धावला त्याच्या मदतीला

-“तो तुझा बाप होता”, म्हणत अनुपम खेर यांच्या आईने त्यांना फटकारले

हे देखील वाचा