बाॅलिवूड विश्वात अनेक कालाकर काम करतात. परंतु, ते प्रामाणिकपणे काम पूर्ण करतीलच असे नाही. कित्येकदा कलाकार सेटवर शूटींग सूरू असताना टाईमपास करताना दिसतात. तसेच प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर कास्टिंग दिग्दर्शक असतात. आजकाल कलाकारांच्या सांगण्यावरून कित्येक कलाकारांचे सहकलाकार बदलले जातात. मनोरंजन विश्वातील अनेक चित्रपट कथा आणि कलाकार यांचा विचार करून चित्रपट बनवले जातात. बाॅलिवूडमध्ये एकदाच नाही, तर कित्येक वेळा कलाकारांच्या सांगण्यावरून चित्रपटातील अभिनेत्री आणि अभिनेते बदले गेले आहेत. काही कलाकार वैयक्तिक वादामुळे, तर काही कलाकार जुने वाद लक्षात घेता, एकमेकांसोबत काम करत नाहीत. चला तर मग पाहुयात हे कलाकार आहेत तरी कोण?
अमिताभ बच्चन-करीना कपूर खान
बाॅलिवुडचे दिग्ज अभिनेते अमिताभ बच्चन आणि करीना कपूर खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अमिताभ यांच्या सांगण्यावरून करीनाला एका चित्रपटातून बाहेर काढण्यात आले होते. माध्यमातील वृत्तानुसार, ‘ब्लॅक’ चित्रपटात राणीच्या अगोदर करीनाची निवड करण्यात आली होती. परंतू, अभिषेक बच्चन आणि करीश्माचे लग्न मोडलेल्यानंतर कपूर आणि बच्चन कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या कारणास्तव अमिताभ यांना करीनासोबत काम करायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी करीनासोबत काम करण्यास नकार दिला.
शाहरुख खान-ऐश्वर्या राय
शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायचा ‘मोहब्बतें’ आणि ‘देवदास’ चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील दोघांच्या रोमान्सवर चाहते फिदा झाले होते. त्या दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्यांच्या जोडीला चाहत्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. परंतू, शाहरुखच्या सांगण्यावरुन एक नाही, तर पाच चित्रपटातून ऐश्वर्याला बाहेर काढण्यात आले. त्या गोष्टीमुळे ऐश्वर्याला प्रचंड राग आला होता. त्यावेळी शाहरुखने ऐश्वर्याची माफीही मागितली होती. परंतू शाहरुख म्हणाला की, चित्रपटातून बाहेर काढण्याचा निर्णय मी घेतला नव्हता, तर तो निर्णय निर्मात्यांनी घेतला होता.
सलमान खान- आलिया भट्ट
संजय लीला भन्साळी दिग्दर्शत ‘इंशाअल्लाह’ चित्रपट सलमान खान आणि आलिया भट्ट एकत्र दिसणार होते. परंतू, आलिया सलमानपेक्षा वयाने खूप छोटी आहे. त्यामुळे सलमानने स्वत: हा चित्रपट नाकारला. या चित्रपटात सलमान संजय भन्साळीसोबत १३ वर्षांहून अधिक काळानंतर काम करणार होता. पण हा चित्रपट सलमानने केला नाही.
आमिर खान-श्रीदेवी
बाॅलिवूड दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत प्रचंड यश मिळवले. श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्यांनी चित्रपटसृष्टीत खूप स्ट्रगल करून आपले नाव कमावले. अनेक कलाकारांना त्यांच्यासोबत काम करण्याची तीव्र इच्छा होती.
मात्र, अभिनेता आमिर खानने त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. आमिरने ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात काम केल्यानंतर, तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यामुळे आमिर आणि श्रीदेवी यांच्या चित्रपटाची खूप चर्चा रंगली होती. पण श्रीदेवी वयाने आमिरपेक्षा मोठ्या असल्याने, त्याने त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध
-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज