प्रेमासाठी काहीही! प्रेम मिळवण्यासाठी ‘या’ कलाकारांनी चित्रपटात हद्दच केली पार, सुनील शेट्टीही यादीत सामील


बॉलिवूडमधील काही कलाकार ज्यांनी माथेफिरू प्रियकराची भूमिका निभावली होती, त्यांना चाहते आजही विसरू शकले नाहीत. त्यांचे बॉलिवूड आणि प्रेक्षकांसोबतचे नाते खूप जवळचे मानले जाते. बरेच चाहते कायम आपल्या आवडत्या कलाकाराचे अनुकरण करताना दिसतात. मग ते ड्रेसची कॉपी असो किंवा एखाद्याला मागणी घालायचा प्रसंग असो, ते कायमच काहीतरी हटके करण्याकरता कलाकारांचे अनुकरण करताना दिसतात. चित्रपटांमध्ये मागणी कशा पद्धतीने घालता येते, याचे काही हटके तर कधी भयानक प्रसंग दाखवले जातात. याचेच अनुकरण करत काही मुलं गुंडगिरी करून मुलींचे प्रेम मिळवण्याचा प्रयत करत असतात, पण खऱ्या आयुष्यात मात्र असा करण्याच्या प्रयत्नात अनेकांना मुलींनी पोलिस स्टेशनचा रस्ता दाखवला आहे. आज चित्रपटातील आपण अशा पात्रांविषयी दाखवणार आहोत, जे आपल्या प्रेयसीला मिळवण्याकरता कोणत्याही थराला गेले आहेत.

शाहरुख खान (डर)
एक-दोन चित्रपटात शाहरुखने वेड्या प्रियकराची भूमिका केली आहे. त्याच्या पात्रांमध्ये बर्‍याचदा ग्रे शेड्स असतात. त्याच वेळी ‘डर’ चित्रपटात त्याचे प्रेमाचे असे भयानक दृश्य दाखवले होते की, नायिकेपासून चित्रपट पाहणारा प्रेक्षकही घाबरला होता. डर या चित्रपटात शाहरुखने एका छेड काढणाऱ्या मुलाची भूमिका साकारली होती, जो आपले प्रेम मिळवण्यासाठी कुणालाही ठार मारण्यास मागेपुढे पाहत नाही. हा चित्रपट पडद्यावर जबरदस्त हिट झाला होता.

धनुष (रांझना)
धनुषने कुंदन बनून प्रेमाचे असे रूप दाखवले की, प्रेक्षक त्याला पाहून स्तब्धच झाले. झोयाच्या प्रेमात पडलेला कुंदन, आपले प्रेम मिळवण्यासाठी, गल्ली बोळ्यातील मुलं जे काही करतात, ते सगळं कुंदनने करून दाखवले आहे. कुंदनचे वेड केवळ येथेच थांबत नाही. झोयाच्या नजरेत स्वत: ला सिद्ध करण्यासाठी, कुंदन मरायलाही तयार होतो. या चित्रपटात धनुष आणि सोनमच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

शाहरुख खान (देवदास)
एखाद्याच्या प्रेमात जग विसरणे म्हणजे वेडेपणा देखील आहे. ‘देवदास’ चित्रपटात शाहरुखने एका प्रियकराची भूमिका केली होती, जो आपल्या मैत्रिणीसाठी आपले जीवन फक्त नरकच बनवत नाही, तर स्वत: ला नरकात ढकलून देतो. त्याच्याकडे पैशांची, गाड्यांची आणि मुलींची कमतरता नाही, परंतु त्याला हवे असते ते पारोचे प्रेम. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातील शाहरुखची भूमिका चांगलीच नावाजली गेली होती.

सुनील शेट्टी (धडकन)
‘धडकन’ चित्रपटात सुनील शेट्टीने अंजलीवर प्रेम करणारा देव नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. देव हा एक असा प्रेमी आहे जो गर्विष्ठ स्वभावाचा आहे, आणि अंजलीला कोणत्याही किंमतीत स्वतःपासून दूर जाऊ देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा अंजलीने राम बरोबर लग्न केले, तेव्हा तो दोघांनाही वेगळे करण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी त्याला कळते की, अंजली रामसोबत जास्त खुश राहील. या चित्रपटातील सुनील शेट्टीची व्यक्तिरेखा आजही लोकांना बरीच आवडते.

शाहिद कपूर (कबीर सिंग)
‘कबीर सिंग’मध्ये शाहिदने माथेफिरू प्रियकराची भूमिका केली होती. कबीर एक अव्वल विद्यार्थी आहे, एक उत्तम डॉक्टर आहे, परंतु तो प्रीतिच्या प्रेमात पडला आहे. प्रीतिला मिळण्याची त्याला समाजात ना कोणाची भीती आहे, ना कोणाची फिकीर आहे. जेव्हा तो स्वतःमध्ये एक चांगला बदल करतो, तेव्हा त्याला प्रीति मिळते.

या चित्रपटातील शाहिदच्या व्यक्तिरेखेबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, त्याच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवव्या वर्षी पहिला सिनेमा करुन ३००हून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या अरुणा इराणींना प्रेरणादायी सिनेप्रवास

-बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध जोडप्यांना लग्नानंतर झाले नाही मूल, दिलीप कुमार अन् सायरा बानोचाही समावेश


Leave A Reply

Your email address will not be published.