बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध जोडप्यांना लग्नानंतर झाले नाही मूल, दिलीप कुमार अन् सायरा बानोचाही समावेश


बॉलिवूडमध्ये काही जोड्या अशा आहेत की, चाहत्यांनी त्या कलाकारांवरती भरभरून प्रेम केले आहे. त्या जोड्या आजही खूप प्रसिद्ध आहेत. आयुष्यात प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी मिळतात, असे नाही. पण आपल्याकडे आहे त्या गोष्टीचा आनंद घेत पुढे जात राहिला, तर आयुष्य खूप सहज आणि सोपे होते, हे काही कलाकारांनी दाखवून दिले आहे. तसेच आज ते एकमेकांसोबत प्रचंड खुश आहेत. आज आपण अशा काही जोड्यांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांना मूल नाही, पण तरीही त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.

दिलीप कुमार आणि सायरा बानो
दिलीप कुमार आणि सायरा बानो हे या सिनेजगातले प्रसिद्ध जोडपे मानले जातात. १९६६ मध्ये दिलीप कुमार आणि सायरा बानो या प्रेमळ जोडीचे लग्न झाले. लहान वयातच सायरा बानो यांना दिलीप कुमार खूप आवडले होते. त्या दिलीप कुमार यांचे स्वप्नं पाहत असे, तर दिलीप कुमार यांनाही सायरा आवडल्या होत्या. अशा परिस्थितीत दोघांचे लग्न झाले. मात्र, लग्नानंतर या दोघांनाही मूलबाळ झाले नाही. सायरा बानो या दिलीप कुमार यांची खूप काळजी घेतात, आणि दिलीप कुमारही सायरा यांच्याबरोबर वेळ घालवतात. सायरा बानो यांच्यासाठी, दिलीप कुमार काळजाचा तुकडा आहेत. या दोघांनीही मूल नसल्याचे दु: ख त्यांनी व्यक्त केले नाही.

जावेद अख्तर- शबाना आझमी
शबाना आझमी या जावेद अख्तर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांच्या आधी जावेद अख्तर यांनी हनी इराणींशी लग्न केले होते. या लग्नापासून त्यांना दोन मुले होती, फरहान अख्तर आणि झोया अख्तर. जावेद आणि शबानाच्या लग्नानंतर, मात्र मूल नव्हते. या जोडप्याला या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही. शबाना आझमी या झोया आणि फरहानला त्यांचीच मुले मानतात.

अनुपम खेर- किरण खेर
अनुपम खेर आणि किरण खेर यांची भेट नाटकात झाली होती. हे दोघेही आपापल्या आयुष्यात आधीच विवाहित होते. या दोघांनी आपल्या जोडीदाराशी न पटल्याने घटस्फोट घेतला. या प्रेमळ जोडीने १९८५ साली दुसरे लग्न केले. किरण खेर यांना त्यांच्या पहिल्या लग्नापासून मुलगा झाला होता, पण अनुपम यांना लग्नानंतर मूलबाळ नव्हते. त्याचवेळी अनुपम यांनी, किरण यांच्या मुलाला आपले नाव दिले आहे, आणि आज हे जोडपे एकमेकांसोबत खूप खुश राहतात.

सलीम- हेलन

सलीम खान यांनी सलमा यांच्याशी लग्न केले, आणि त्यांना चार मुले झाली. त्यात अल्विरा, अरबाज, सोहेल आणि सलमान खान. यानंतर सलीम खान यांना हेलन आवडल्या, आणि १९८१ मध्ये सलीम खान यांनी हेलन यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर सलीम आणि हेलन यांना मूल नाही झाले, तरीही संपूर्ण कुटुंब एकमेकांवर खूप प्रेम करतात, आणि सर्व एकत्र राहतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवव्या वर्षी पहिला सिनेमा करुन ३००हून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या अरुणा इराणींना प्रेरणादायी सिनेप्रवास


Leave A Reply

Your email address will not be published.