प्रत्येक आई-बाप आपल्या मुलाबाळांना आपल्या जीवापेक्षा जास्त जपत असतात. त्यांना काय हवं, काय नको या गोष्टींची ते काळजी घेतात. आपली मुले पुढे जाऊन अडचणीत सापडू नये, म्हणून पालक त्यांना आधीच काही गोष्टींबद्दल सांगत असतात. असेच काहीसे बॉलिवूडमधील कलाकारांविषयी आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हेदेखील त्यांच्या मुलाबाळांची खूप जास्त काळजी घेतात. अशातच गौरी खान नुकतीच एका शोमध्ये पोहोचली होती, जिथे तिने तिच्या मुलीच्या डेटिंगच्या प्रश्नावर मजेशीर उत्तर दिले.
खरं तर, शाहरुख खान (Shahrukh Khan) याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) ही ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) शोमध्ये भावना पांडे आणि महीप कपूर यांच्यासोबत पोहोचली होती. यावेळी करण जोहर (Karan Johar) याने त्याच्या शोमधील आगामी एपिसोडचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो बॉलिवूड अभिनेत्यांच्या पत्नींशी चर्चा करताना दिसत आहे. या शोमध्ये सर्वात जास्त चर्चा गौरीची रंगलीय. कारण, ती खूप कमी चॅट शोमध्ये दिसते. या शोमध्ये शाहरुखचाही कॅमियो पाहायला मिळणार आहे. म्हणजेच, गौरी त्याच्यासोबत फोनवर चर्चा करणार आहे. इतकेच नाही, तर करण गौरीला विचारणार आहे की, ती सुहानाला डेटिंगबद्दल काय सल्ला देऊ इच्छिते. या प्रश्नावर गौरीही मजेशीर उत्तर देताना दिसणार आहे.
गौरीचा सुहानाला सल्ला
यावेळी करण गौरीला विचारतो की, सुहानाला डेटिंगसाठी सल्ला देते का? यावर उत्तर देत गौरी म्हणते की, “एकावेळी दोन व्यक्तींना कधीच डेट करू नको.” यानंतर दुसरा प्रश्न विचारला की, शाहरुख खान आणि तुझ्या प्रेमकथेला तू कोणत्या सिनेमाचे नाव देशील? यावर गौरी म्हणाली की, “दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे.” गौरी खानच्या या उत्तराशी करण जोहरनेही सहमती दर्शवली.
View this post on Instagram
गौरीने केला शाहरुखला फोन
करण यावेळी तिन्ही पाहुण्यांना त्यांच्या पतींना कॉल करण्यास सांगतो. यावर गौरी फोन लावते, तेव्हा करण म्हणतो की, जर शाहरुखने फोन उचलला, तर गौरीला 6 गुण मिळतील. शाहरुक गौरीचा फोन उचलतो आणि तो करणलाही ‘हाय’ म्हणतो. या प्रोमो व्हिडिओवर चाहत्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. तसेच, अनेकजण गौरीला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. यासोबतच चाहते, शाहरुखलाही या शोमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एमएमएस व्हिडिओप्रकरणी अंकिताचे कळकळीचे आवाहन; म्हणाली, ‘आपल्या घरी आई-बहिणी आहेत, कृपया…’
‘काश्मिर फाईल्स’चा विक्रम मोडताच संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘मी या फालतू स्पर्धेत…’
कार्तिक आर्यनला भेटण्यासाठी चिमुकल्या चाहत्याने केलं असं काही की….; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क