‘काश्मिर फाईल्स’चा विक्रम मोडताच संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘मी या फालतू स्पर्धेत…’

0
70
Vivek-Agnihotri
Photo Courtesy: Instagram/vivekagnihotri

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) चित्रपट ब्रह्मास्त्र बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यातच २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. रिलीजपूर्वी बॉयकॉट ब्रह्मास्त्र सोशल मीडियावर ट्रेंड झाला होता, मात्र या ट्रेंडचा चित्रपटाच्या कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही. वृत्तानुसार, ब्रह्मास्त्रने अनुपम खेरच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचा विक्रम मोडला असून वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ने ब्रह्मास्त्रचा रेकॉर्ड मोडल्याच्या बातमीने विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) मात्र चांगलेच संतापले आहेत. ही पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, The Kashmir Files ने जगभरात 340 कोटींचा व्यवसाय केला. त्याचवेळी ब्रह्मास्त्रने हा आकडा ओलांडला असून जगभरात 350 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. त्यानंतर ब्रह्मास्त्र 2022 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. सोशल मीडियावर ‘द काश्मीर फाइल्स’चा रेकॉर्ड मोडणारी ब्रह्मास्त्रची पोस्ट पाहून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री संतापले आहेत

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटरवरुन याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी “हाहाहा, मला कळत नाही की त्यांनी काश्मीर फाइल्सला कसे मागे टाकले. स्टिक, रॉड, हॉकी किंवा AK47 किंवा दगडाने पीआर आणि शक्तींनी कसे मारले? बॉलिवूड चित्रपटांना एकमेकांशी स्पर्धा करू द्या. आम्हाला एकटे सोडा मी या मूर्ख शर्यतीचा भाग नाही. धन्यवाद.” असे म्हणत ब्रम्हास्त्र च्या यशावर जोरदार टिका केली आहे.

सोशल मीडियावर काही दिवसांपासून बहिष्काराचा ट्रेंड सुरू आहे. यावर विवेक अग्निहोत्री नुकतेच बोलत होते. एका न्यूज पोर्टलसोबतच्या मुलाखतीत त्यांनी “ही एक गुंतागुंतीची समस्या आहे आणि ‘बॉलिवुडवर बहिष्कार टाका’ मोहीम ‘खूप चांगली’ आहे कारण बॉलीवूड काय विचार करत आहे याबद्दल लोकांची निराशा दर्शवते. अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याचबरोबर त्यांनी मी बॉलीवूडचा भाग नाही, जे माहित असलेले आणि वापरलेले प्रयोग करतात उलट मी यापेक्षा वेगळे चित्रपट करतो,” असेही सांगितले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- कार्तिक आर्यनला भेटण्यासाठी चिमुकल्या चाहत्याने केलं असं काही की….; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
‘स्पर्धाच घेऊ नका…’ पुरुषोत्तम करंडकाच्या निकालावर विजू माने यांची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट व्हायरल
एवढी घेतली की चालताही येईना? व्हायरल व्हिडिओमुळे अभिनेत्री सारा अली खान झाली ट्रोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here