Saturday, June 29, 2024

‘गौरी खान सोडून गेली, तर मी कपडे फाडून रस्त्यात…’, शाहरुखने मुलाखतीत केला होता खुलासा

बॉलिवूड ‘किंग’ खान शाहरुख हा त्याच्या चित्रपटामुळे जेवढा चर्चेत असतो, तेवढाच चर्चेत तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील असतो. चित्रपटसृष्टीतील रोमँटिक हिरो म्हणून त्याला ओळखले जाते. शाहरुख खानच्या आयुष्यातील त्याची लव्ह स्टोरी खूप कमी लोकांना माहित आहे. शाहरुख खानचे लग्न गौरीसोबत झाले आहे. गौरी एक इंटेरियर डिझायनर आहे. त्यांची प्रेम कहाणी ही प्रेरणादायी आहे. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही त्यांच्या प्रेमात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यांचे हे नाते कोणत्याही अटीशिवाय आजपर्यंत चालले आहे. नुकताच शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री फरिदा जलाल ही शाहरुख खानची मुलाखत घेताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, फरीदा जलाल ही शाहरुख खानला प्रश्न विचारताना दिसत आहे. ती त्याला विचारते की, “जर एखाद्या सकाळी गौरी तुला कंटाळून गुड बाय बोलू निघून गेली तर ती काय करशील?”

या प्रश्नाचे खूप सुंदर अंदाजात उत्तर देत त्याने सांगितले की, “आजपर्यंत असं‌ कधी झालं नाहीये. अस कधी घडलं पण नाही पाहिजे, कारण मी तिचा पती आहे. पण जर असं झालंच तर मी कपडे फाडून रस्त्यात उभा राहून गाणे म्हणेल की, “गोरी गोरी ओ बाकी छोरी कभी मेरे घर भी आया करो.” शाहरुख खानच्या या उत्तराने सगळेच खूप खुश झाले.

शाहरुख खान आणि गौरी खानची पहिली भेट 1984 मध्ये झाली होती. शाहरुखला जेव्हा गौरीवर प्रेम झाले, तेव्हा ती केवळ 18 वर्षाची होती. त्यांनतर 25 ऑक्टोंबर, 1991 रोजी दोघांनी लग्न केले. शाहरुख खानने त्याच्या लग्नात तोच सूट घातला होता जो त्याने ‘राजू बन गया जंटलमॅनमध्ये घातला होता. शाहरुख खानच मुलगा आर्यन खान याचा जन्म 13 नोव्हेंबर, 1997 मध्ये झाला आहे. याव्यतिरिक्त त्याला सुहाना खान आणि अबराम खान ही मुलेही आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा