Wednesday, October 9, 2024
Home टेलिव्हिजन शैलेश लोढा यांनी तारक मेहता कार्यक्रम सोडल्यानंतर प्रेक्षकांनी धरले निर्मात्यांना जबाबदार, वाचा काय आहे प्रकरण

शैलेश लोढा यांनी तारक मेहता कार्यक्रम सोडल्यानंतर प्रेक्षकांनी धरले निर्मात्यांना जबाबदार, वाचा काय आहे प्रकरण

सर्वात लोकप्रिय टीव्ही शोपैकी एक ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासू या कार्यक्रमाला अनेक कलाकारांनी रामराम ठोकला होता. ज्यामुळे कार्यक्रमाचे चाहते चांगलेच नाराज झाले होते. अलिकडेच कार्यक्रमातील महत्वाचे कलाकार तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा(Shailesh Lodha) यांनीही कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली होती. आता यावरुनच प्रेक्षकांनी कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडल्याची चर्चा आहे, या वृत्तांना अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी शैलेश लोढा यांच्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. परंतु आता त्यांंनी या कार्यक्रमाला निरोप दिल्याच्या बातमीवर शिक्का मोर्तब झाले आहे. यासाठी प्रेक्षकांनी कार्यक्रमाच्या निर्मात्यांना जबादार धरले आहे. शैलेश लोढा यांनी या कार्यक्रमासाठी त्यांचा वेळ आणि तारखा निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे परंतु निर्मात्यांकडून त्याचा योग्य प्रकारे वापरच झाला नसल्याचा आरोप प्रेक्षक लावत आहेत. यामुळेच प्रेक्षकांंनी निर्माते असीम मोदी यांच्यावर टीका केली आहे.

https://www.instagram.com/p/Cdqz9_rAKT8/?utm_source=ig_web_copy_link

प्रत्येक कार्यक्रमातील कलाकारांना निर्मात्यांच्या संमंतीशिवाय दुसऱ्या कार्यक्रमात सहभागी होता येत नाही किंवा ते कोणताही दुसरा प्रोजेक्ट करु शकत नाहीत . तसा करार सुरूवातीलाच झालेला असतो. हाच धागा पकडत प्रेक्षकांनी कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर कार्यक्रमातील प्रमुख कलाकार दिलीप जोशी यांनी मात्र शैलेश लोढा पुन्हा कार्यक्रमात दिसू शकतात असेही सांगितले आहे. त्यामुळे प्रेक्षक चांगलेच गोंधळात सापडले आहेत. दरम्यान असे असले तरी या कार्यक्रमाला आजही प्रेक्षकांची जोरदार पसंती पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची मने जिंकण्यात हा कार्यक्रम नेहमीच अव्वल राहिला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिक आर्यनच्या रोमँटिक थ्रिलर ‘फ्रेडी’चा टीझर रिलीज, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

काय ती अदा, मलायका अरोराने दाखवली सौंदर्याची जादू!

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा