Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

धक्कादायक! तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेतील ‘या’ लोकप्रिय कलाकाराने सोडली मालिका?

टेलिव्हिजनविश्वातील सर्वात जास्त गाजणारी मालिका म्हणून ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेचे नाव सर्वप्रथम येते. या मालिकेने तब्ब्ल १३ वर्षांपासून प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त चालणारी आणि गाजणारी ही मालिकेत टीआरपीमध्ये देखील सतत टॉपवर असते. मालिकेतील प्रत्येक पात्र आता जणू प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्यच बनल्याचे चित्र आहे. मालिकेसंदर्भात नेहमीच विविध बातम्या येत असतात. मात्र सध्या जी बातमी येत आहे ती ऐकून सर्वानाच धक्का बसणार आहे.

मालिकेतील सर्वच कलाकार मालिकेसोबतच तुफान गाजले. य मालिकेने सर्वानाच एक नवीन ओळख आणि प्रसिद्धी मिळवून दिली. आता या मालिकेतील सूत्रधार, जेठालालचे परममित्र असणारे आणि तारक मेहता ही महत्वाची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी मालिकेला रामराम ठोकला आहे. याबद्दल अधिकृत माहिती चॅनेल, निर्माते किंवा शैलेश यापैकी कोणीही दिली नसली तरी इंडस्ट्रीमध्ये सध्या शैलेश यांनी मालिका सोडल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. जवळपास १४ वर्ष शैलेश या मालिकेशी जोडले गेले होते.

एका मीडिया रिपोर्टनुसार शैलेश हे एप्रिल महिन्यापासून शूटिंगलाच गेले नसून पुढे देखील ते शूटिंगसाठी जाणार नसल्याचे समजत आहे. याशिवाय शैलेश हे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमुळे नाखुश असून त्यांचे म्हणणे आहे की, शोमध्ये त्याच्या तारखांचा नीट उपयोग केला जात नाही.” शैलेश यांची मालिकेतील भूमिका अमाप लोकप्रिय आणि प्रसिद्ध असून, त्यांना आता तर्क मेहता याचा नावाने ओळखले जाते. या मालिकेने त्यांना खूप काही दिले आहे. आता शैलेश मालिकेत दिसणार नाही या विचारानेच मालिकेच्या आणि त्यांच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे. आता याबद्दल अधिकृत माहिती येण्याची सर्वच लोकं वाट बघत आहे.

तत्पूर्वी मूळचे राजस्थाचे असणारे शैलेश लोढा एक लोकप्रिय कवी आणि शायर आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात २००७ साली ‘कॉमेडी सर्कस’पासून केली. त्यानंतर त्यांना २००८ साली ‘तारक मेहता’ शो मिळाला. यादरम्यान त्यांनी अनेक शोचे सूत्रसंचालन देखील केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा