Monday, June 17, 2024

अरे वाह! हंसिका माेटवानी डिसेंबरमध्ये ‘या’ व्यक्तीसोबत अडकणार लग्न बंधनात

अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलीवूड ते साऊथ सिनेमापर्यंत आपल्या अभिनयाने छाप साेडणारी हंसिका लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, हंसिका मोटवाली 4 डिसेंबर 2022 रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. हंसिकाच्या चाहत्यांसाठी ही बातमी आश्चर्यापेक्षा कमी नाही. मात्र, हंसिका काेणासाेबत लग्न करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. काेण आहे ताे लकी मॅन चला जाणून घेऊया…

हंसिका मोटवानी (hansika motwani) तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हंसिका ज्याला आपली जीवनसाथी बनवणार आहे, त्या रहस्यमय व्यक्तीवरून आता अखेर पडदा उठला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, जयपूरमधील मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये हंसिकाचे लग्न मोठ्या थाटात पार पडणार आहे. तिच्या लग्नाची डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तयारी सुरू हाेणार आहे. हंसिकाचे डेस्टिनेशन वेडिंग असेल, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित असतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

माध्यमातील वृत्तानुसार, हंसिकाच्या लग्नाचे कार्यक्रम 2 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. 2 डिसेंबरला हंसिकाचा मेहंदी सोहळा होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी संगीत विधी पूर्ण हाेईल, जो वेगळ्या थीममध्ये साजरा केला जाईल. हंसिकाच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनला काही ना काही थीम आणि ड्रेस कोड असणार आहे. अशा अनेक कार्यक्रमांमध्ये कॅसिनो थीम पार्टीचेही आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येकाला थीमच्या आधारे लग्नाची तयारी करून उपस्थित राहावे लागेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

हंसिका मोटवानीच्या लग्नाच्या कार्यक्रमांची माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या हेणाऱ्या पतीचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. पण, ती सोहेल कथोरिया नावाच्या व्यावसायिकासोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे. ‘शका लाका बूम-बूम’ सारख्या लोकप्रिय शोमध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या हंसिकाने अनेक साऊथ चित्रपटांमध्येही आपली जादू चालवली आहे. तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विराट कोहलीच्या हॉटेलच्या रूमचा व्हिडिओ पाहून भडकली अनुष्का शर्मा; म्हणाली, ‘सर्वात वाईट’

काय सांगता! स्पर्धकाच्या विनंतीवरून अमिताभ बच्चन यांनी केला रॅम्प वॉक

हे देखील वाचा